गणना 29
29
कर्ण्यांचा सण
1“ ‘सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र सभा भरवा व नियमित कामे करू नये. तो तुमच्यासाठी कर्णे वाजविण्याचा दिवस आहे. 2याहवेहस आवडणारा सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावेत. 3गोर्ह्याबरोबर जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश#29:3 अंदाजे 5 कि.ग्रॅ. बारीक पिठाचे धान्यार्पण अर्पावे; व मेंढ्याबरोबर दोन दशांश#29:3 अंदाजे 3.2 कि.ग्रॅ.; 4आणि सात कोकर्यातील प्रत्येकासाठी एफाचा एक दशांश.#29:4 अंदाजे 1.6 कि.ग्रॅ. 5तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बोकड अर्पावा. 6मासिक व रोजचे होमार्पण व त्यांचे नेमलेले धान्यार्पण व पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे करावी. ही याहवेहस आवडणारी सुवासिक अन्नार्पणे आहेत.
प्रायश्चित्ताचा दिवस
7“ ‘याच सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी एक पवित्र सभा भरवा. तुम्ही स्वसुखाचा त्याग#29:7 म्हणजे उपास करावा व कोणतेही नियमित काम करू नये. 8याहवेहला सुवास म्हणून एक तरुण गोर्हा, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण सादर करा, ते सर्व निर्दोष असावेत; 9गोर्ह्याकरिता तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ; आणि मेंढ्याकरिता दोन दशांश असे धान्यार्पण करावे; 10आणि सात कोकर्यातील प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. 11प्रायश्चित्ताचे पापार्पण, नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण व त्याचे पेयार्पण, याबरोबरच पापार्पणासाठी एक बोकड अर्पण करावा.
मंडपांचा सण
12“ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र सभा बोलवा आणि त्या दिवशी कोणतीही नियमित कामे करू नये. हा सण तुम्ही याहवेहसाठी सात दिवस पाळावा. 13आणि तुम्ही याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून तेरा गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. 14या प्रत्येकी तेरा गोर्ह्यांबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक एफाचे तीन दशांश बारीक पीठ; व दोन मेंढ्यांबरोबर प्रत्येकी दोन दशांश; 15आणि चौदा कोकर्यांबरोबर प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. 16नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
17“ ‘दुसर्या दिवशी, बारा तरुण गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावे व हे सर्व निर्दोष असावेत. 18गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 19नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
20“ ‘तिसर्या दिवशी अकरा गोर्हे, दोन मेंढे, व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी. हे सर्व निर्दोष असावेत. 21गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 22नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
23“ ‘चौथ्या दिवशी दहा गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पण करावी, हे सर्व निर्दोष असावेत. 24गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 25नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
26“ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 27गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 28नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
29“ ‘सहाव्या दिवशी आठ गोर्हे, दोन मेंढे, एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 30गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 31नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
32“ ‘सातव्या दिवशी सात गोर्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत. 33गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 34नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
35“ ‘आठव्या दिवशी विशेष समारोप सभा बोलवावी व कोणतीही नियमित कामे करू नये. 36याहवेहसाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे सुवासिक अन्नार्पण म्हणजेच होमार्पण अर्पावे. हे सर्व निर्दोष असावेत. 37गोर्हा, मेंढा व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे. 38नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.
39“ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”
40याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणे मोशेने सर्वकाही इस्राएली लोकांना सांगितले.
सध्या निवडलेले:
गणना 29: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.