नहेम्या 10
10
1या करारावर सही करणाऱ्यांची नावे:
राज्यपाल:
हखल्याहचा पुत्र नहेम्याह.
सिद्कीयाह, 2सेरायाह, अजर्याह, यिर्मयाह,
3पशहूर, अमर्याह, मल्कीयाह,
4हट्टूश, शबन्याह, मल्लूख,
5हारीम, मरेमोथ, ओबद्याह,
6दानीएल, गिन्नथोन, नेरीयाहचा पुत्र बारूख,
7मशुल्लाम, अबीया, मियामीन,
8माझियाह, बिल्गई व शमायाह.
वर नोंदवलेले सर्वजण याजक होते.
9लेवी:
अजन्याचा पुत्र येशूआ, हेनादादाचा पुत्र बिन्नुई, कदमीएल,
10आणि त्याचे सहकारीः शबन्याह,
होदीयाह, कलीता, पेलतियाह, हानान,
11मीखा, रहोब, हशब्याह,
12जक्कूर, शेरेब्याह, शबन्याह,
13होदीयाह, बानी व बनीनू.
14लोकांचे पुढारी:
पारोश, पहथ-मोआब, एलाम, जत्तू, बानी,
15बुन्नी, अजगाद, बेबाई,
16अदोनियाह, बिग्वई, आदीन,
17आतेर, हिज्कीयाह, अज्जूर,
18होदीयाह, हाशूम, बेसाई,
19हारीफ, अनाथोथ, नोबाई,
20मग्पीयाश, मशुल्लाम, हेजीर,
21मशेजबेल, सादोक, यद्दूआ,
22पेलतियाह, हानान, अनायाह,
23होशेय, हनन्याह, हश्शूब,
24हल्लोहेश, पिल्हा, शोबेक,
25रहूम, हशबनाह, मासेयाह,
26अहीयाह, हानान, अनान,
27मल्लूख, हारीम व बाअनाह.
28“बाकी सर्व—याजक, लेवी, द्वारपाल, संगीतकार, मंदिराचे सेवक आणि बाकीचे इतर सर्व, ज्यांनी आपल्या पत्नी व सज्ञान पुत्र व कन्या यांच्यासह, परमेश्वराच्या नियमासाठी स्वतःला सभोवतीच्या लोकांपासून वेगळे केले होते— 29त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.
30“आम्ही असेही वचन देतो की आम्ही आमच्या कन्यांना यहूदीतर पुरुषांशी व पुत्रांना यहूदीतर कन्यांशी विवाह करू देणार नाही.
31“शेजारील देशात असणार्या लोकांनी विक्रीसाठी धान्य किंवा इतर उत्पन्न आणले, तर शब्बाथ दिवशी किंवा इतर पवित्र दिवशी आम्ही ते विकत घेणार नाही. दर सातव्या वर्षी शेतात कोणतेही पीक न घेण्याचे आम्ही मान्य केले आणि सर्व कर्ज प्रत्येक सातव्या वर्षी माफ करू.
32“प्रत्येक वर्षी परमेश्वराच्या भवनाच्या सेवेकरिता: प्रत्येकी एक शेकेलचा तिसरा भाग#10:32 अंदाजे 4 ग्रॅ. चांदी देण्याची आज्ञा पाळण्याची; 33समक्षतेची खास भाकर; नियमित धान्यार्पणे व होमार्पणे; शब्बाथासाठी अर्पणे, अमावस्येचा सण आणि ठराविक सण; पवित्र अर्पणे; इस्राएलच्या प्रायश्चित्तविधीसाठी पापार्पणे;#10:33 किंवा शुद्धीकरणाचे अर्पण आणि परमेश्वराच्या भवनाची सेवा करण्याची जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
34“आम्ही—याजक, लेवी आणि लोकांनी—लाकडांचा पुरवठा निर्धारित करण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या की आमच्या प्रत्येक कुटुंबांनी आमच्या परमेश्वराच्या भवनात आणावे जेणेकरून याहवेह आमच्या परमेश्वराच्या वेदीवर जाळण्यासाठी नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे लाकूड आणायचे आहे.
35“प्रत्येक पिकाचा व प्रत्येक फळझाडाचा पहिला उपज दरवर्षी याहवेहच्या भवनामध्ये द्यावा अशी जबाबदारीही आम्ही स्वीकारली.
36“नियमांत लिहिल्यानुसार, प्रथम जन्मलेला पुत्र व आमच्या गोठ्यातील व कळपातील जनावरांचे प्रथमवत्स, परमेश्वराच्या भवनामध्ये सेवा करणाऱ्या याजकांकडे आम्ही ते सादर करू.
37“याशिवाय आमच्या परमेश्वराच्या भवनातील कोठारासाठी याजकाकडे प्रथम दळलेले पीठ, आमचे धान्यार्पण व फलार्पण, नवा द्राक्षारस आणि जैतुनाच्या तेलाचा पहिला हिस्सा आणू. आम्ही आमच्या प्रत्येक उत्पन्नाचा एक दशांश लेव्यांना देण्याचे वचन दिले, कारण आम्ही जिथे काम करतो त्या सर्व नगरातून दशांश जमा करण्याची जबाबदारी लेव्यांची होती. 38लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा. 39इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत.
“अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”
सध्या निवडलेले:
नहेम्या 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.