YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मीखाह 3

3
पुढारी आणि संदेष्टे यांना फटकारणे
1तेव्हा मी म्हणालो,
याकोबाच्या पुढार्‍यांनो,
इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका.
तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,
2तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता;
तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता,
आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;
3तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता,
त्यांची कातडी सोलता
आणि त्यांची हाडे मोडता,
आणि पातेल्यात शिजविण्यासाठी
मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.
4मग ते याहवेहचा धावा करतील,
पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही.
त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे
याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील.
5याहवेह असे म्हणतात:
“माझ्या लोकांना
चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे,
त्यांना काही खायला मिळाल्यास
ते ‘शांती’ ची घोषणा करतात.
परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो
त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.
6म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही,
आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय!
या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल
आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.
7द्रष्ट्यांना लाज वाटेल
आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील.
ते सर्व आपली मुखे झाकतील
कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.”
8परंतु माझ्याबाबतीत म्हणाल,
तर याकोबाला त्याचे अपराध
आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी
मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने
परिपूर्ण आहे.
9अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो,
इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका,
तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता
आणि चांगल्या गोष्टी विकृत करता;
10सीयोनला रक्तपाताने
आणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे.
11तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात,
तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात,
व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात.
तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात,
“याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय?
आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”
12म्हणून तुमच्यामुळे,
सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल,
यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल,
मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

सध्या निवडलेले:

मीखाह 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन