YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इय्योब 23

23
इय्योब
1मग इय्योबाने उत्तर दिले:
2“आज देखील माझे गार्‍हाणे कडू आहे;
मी कण्हत असतानाही परमेश्वराचा हात माझ्यावर भारी आहे.
3परमेश्वर कुठे आढळेल हे जर मला माहीत असते;
मी जर त्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकलो असतो!
4तर माझा वाद मी त्यांच्यापुढे ठेवली असता
माझी बाजू त्यांच्यापुढे सविस्तर मांडली असती.
5ते मला काय उत्तर देतील हे मी बघेन,
आणि त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन.
6मोठ्या जोमाने ते माझा विरोध करतील काय?
नाही, ते नक्कीच मला दोष लावणार नाहीत.
7सज्जन त्यांच्यासमोर आपली निर्दोषता सिद्ध करू शकतो,
आणि माझ्या न्यायाधीशापासून सर्वकाळासाठी माझी सुटका होईल.
8“परंतु मी जर पूर्वेकडे गेलो तर परमेश्वर तिथे नाही;
आणि पश्चिमेकडे गेलो, तिथेही ते मला सापडत नाहीत.
9जेव्हा ते उत्तरेकडे कार्यरत असतात, तरी मला ते दिसत नाहीत;
जेव्हा ते दक्षिणेकडे वळतात, तेव्हा मला ते ओझरतेही दिसत नाहीत.
10परंतु माझे मार्ग त्यांना अवगत आहेत;
जेव्हा ते मला पारखतील, तेव्हा शुद्ध सोन्‍यासारखा मी प्रमाणित होईन.
11माझ्या पावलांनी काळजीपूर्वक परमेश्वराच्या पावलांचे अनुसरण केले आहे;
दुसरीकडे न वळता मी त्यांच्या मार्गावरच राहिलो आहे.
12मी त्यांच्या मुखातील आज्ञांपासून अलिप्त झालो नाही;
माझ्या दररोजच्या अन्नापेक्षा त्यांच्या तोंडचे शब्द मला मौल्यवान आहेत.
13“परंतु ते अतुलनीय आहेत आणि त्यांचा विरोध करणारा कोण आहे?
त्यांच्या मनास येईल तसेच ते करतात.
14माझ्याविरुद्ध असलेला त्यांचा निवाडा ते पूर्णतेस नेतील,
आणि अशा पुष्कळ योजना त्यांनी माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत.
15म्हणून त्यांच्या समक्षतेत मला भय वाटते;
जेव्हा या सर्वांचा मी विचार करतो, तेव्हा मला त्यांचा दरारा वाटतो.
16परमेश्वराने माझे हृदय क्षीण केले आहे;
सर्वसमर्थाने मला भीतीने जखडले आहे.
17निबिड अंधकार माझे मुख झाकून टाकतो,
परंतु तो मला गप्प करू शकला नाही.

सध्या निवडलेले:

इय्योब 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन