YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 48:17-22

यशायाह 48:17-22 MRCV

याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो. केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते, तर शांती एखाद्या नदीप्रमाणे, तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते, तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते. तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती; त्यांचे नाव कधीही मिटले नसते ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.” बाबेलमधून निघा, खास्द्यांपासून पलायन करा! हे हर्षगर्जना करून जाहीर करा व घोषित करा, “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या. त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत; त्यांनी त्यांच्याकरिता खडकातून पाणी वाहत बाहेर आणले. त्यांनी खडक दुभांगला आणि पाणी उफाळून बाहेर आले. “दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.

यशायाह 48 वाचा