यशया 48:17-22
यशया 48:17-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती; तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.” तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.” त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले. परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”
यशया 48:17-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो. जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते. तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते. आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते. माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला. सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे. तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले. पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.”
यशया 48:17-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह हे असे म्हणतात— जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत: “मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे, जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो, जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो. केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते, तर शांती एखाद्या नदीप्रमाणे, तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते, तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते. तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती; त्यांचे नाव कधीही मिटले नसते ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.” बाबेलमधून निघा, खास्द्यांपासून पलायन करा! हे हर्षगर्जना करून जाहीर करा व घोषित करा, “याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.” अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या. त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत; त्यांनी त्यांच्याकरिता खडकातून पाणी वाहत बाहेर आणले. त्यांनी खडक दुभांगला आणि पाणी उफाळून बाहेर आले. “दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.