यशायाह 15
15
मोआबा विरुद्ध भविष्यवाणी
1मोआब देशाविरुद्ध भविष्यवाणी:
मोआब येथील आर शहर उद्ध्वस्त झाले आहे,
एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!
मोआबातील कीर शहर उद्ध्वस्त झाले आहे,
एका रात्रीत ते नष्ट झाले आहे!
2दिबोन येथील लोक त्यांच्या उच्च स्थानावरील,
मंदिरात विलाप करण्यासाठी जात आहेत;
नबो आणि मेदबासाठी मोआब आक्रोश करीत आहे.
प्रत्येकाच्या डोक्यावरील केस
आणि दाढी काढलेली आहे.
3रस्त्यांवर ते गोणपाट घालतात;
छतावर आणि सार्वजनिक चौकांमध्ये
ते सर्व आक्रोश करतात,
विलाप करीत पालथे पडतात.
4हेशबोन आणि एलिआलेह रडतात,
त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो.
म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात,
आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.
5माझे मन मोआबसाठी रडते;
तिचे पलायन केलेले लोक सोअरपर्यंत,
एग्लाथ-शलीशियापर्यंत पळतात.
ते लुहिथकडे टेकडीवर जातात,
जाताना ते विलाप करतात;
होरोनाईमच्या वाटेवर
ते त्यांच्या नाशासाठी विलाप करतात.
6निम्रीमचे सर्व पाणी आटून गेले आहे
आणि गवत करपून गेले आहे;
वनस्पती सुकून गेली आहे;
आणि हिरवळीसारखे काहीही उरले नाही.
7म्हणून त्यांनी मिळवलेली आणि साठविलेली संपत्ती
ते वाळुंजाच्या खोऱ्यापलीकडे घेऊन जातात.
8त्यांच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी मोआबच्या सीमेपर्यंत येतात.
त्यांचे आक्रंदन एग्लाइमपर्यंत पोहोचते,
त्यांचा विलाप बीर एलिमपर्यंत पोहोचतो.
9दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे,
परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन—
मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर
आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.
सध्या निवडलेले:
यशायाह 15: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.