YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 16

16
1देशाच्या अधिपतीकडे
सेलापासून वाळवंटाच्या पलीकडे
सीयोन कन्येच्या पर्वतापर्यंत
खंडणी म्हणून कोकरे पाठवा.
2घरट्यातून ढकलून दिलेल्या
फडफडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे,
मोआबच्या स्त्रिया
आर्णोनच्या घाटावर आहेत.
3मोआब म्हणतो, “तुमच्या मनाची तयारी करा,
निर्णय द्या.
तुमची सावली रात्रीसारखी करा—
भर दुपारच्या वेळेसारखी.
पलायन केलेल्यांना लपवा,
शरणार्थी लोकांचा विश्वासघात करू नका.
4पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या;
संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.”
जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल,
आणि नाश थांबेल;
आक्रमण करणारे नाहीसे होतील.
5प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल;
दावीदाच्या घराण्यातील#16:5 किंवा डेर्‍यातून एकजण,
विश्वासूपणाने त्यावर बसेल—
जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो
आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.
6मोआबाच्या अभिमानाबद्दल आम्ही ऐकले आहे—
तिचा अहंकार किती मोठा आहे!
तिची घमेंड, तिचा अभिमान आणि तिचा उर्मटपणा;
परंतु तिच्या सर्व फुशारक्या पोकळ आहेत.
7म्हणून मोआबी मोठ्याने रडतात,
मोआबसाठी ते एकत्र मोठ्याने रडतात.
कीर-हरेसेथचा बेदाणा किंवा मनुका मिश्रित पिठाच्या गोड ढेपांसाठी
विलाप आणि शोक करतात.
8हेशबोनची शेते सुकून गेली आहेत,
सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा.
ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या
आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या,
त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली
इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत.
त्यांची कोंबे बाहेर पसरली
आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.
9म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी
याजेरसह मीही रडतो.
हेशबोन आणि एलिआलेह,
मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो!
तुमच्या पिकलेल्या फळांसाठी
आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.
10फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे;
द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही;
कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही,
कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.
11माझे हृदय वीणेप्रमाणे मोआबसाठी विलाप करीत आहे,
कीर-हरेसेथसाठी माझे अंतःकरण विलाप करीत आहे.
12जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते,
तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते;
जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते,
तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.
13याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे. 14परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”

सध्या निवडलेले:

यशायाह 16: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन