होशेय 5
5
इस्राएलविरुद्ध न्याय
1“तुम्ही याजकांनो, हे ऐका!
अहो इस्राएलाच्या घराण्यांनो, लक्ष द्या!
राजघराणे, ऐका!
हा न्याय तुमच्याविरुद्ध आहे:
मिस्पाह येथे तुम्ही पाश झाला आहात,
ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
2बंडखोरांनी भयंकर कत्तल केली आहे,
मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
3एफ्राईमाबद्दल मला सर्वकाही माहीत आहे;
इस्राएल माझ्यापासून लपलेले नाही.
हे एफ्राईमा, तू आता वेश्याव्यवसायाकडे वळला आहेस;
इस्राएल भ्रष्ट झालेला आहे.
4“त्यांची कर्मे त्यांना पुन्हा
त्यांच्या परमेश्वराकडे येऊ देत नाहीत.
वेश्यावृत्तीचा आत्मा त्यांच्या अंतःकरणात आहे;
ते याहवेहला ओळखत नाहीत.
5इस्राएलचा उन्मत्तपणाच त्यांच्याविरुद्ध साक्ष देतो;
इस्राएल आणि एफ्राईम सुद्धा आपल्या पापात अडखळतात;
यहूदीया देखील त्यांच्यासोबत अडखळतो.
6जेव्हा ते आपले मेंढरांचे व गुरांचे कळप घेऊन
याहवेहच्या शोधात फिरतील,
ते त्यांना सापडणार नाही;
कारण त्यांनी स्वतःला त्यांच्यापासून दूर केले आहेत.
7ते याहवेहशी अविश्वासू राहिले;
ते अनौरस लेकरांना जन्म देतात.
जेव्हा ते अमावस्येचा उत्सव साजरा करतील,
तेव्हा ते त्यांच्या शेताला गिळून#5:7 किंवा नाश करतील टाकतील.
8“तुम्ही गिबियाहात शिंग फुंका,
रामाह येथे कर्णा वाजवा.
बेथ-आवेन येथे उंच आवाजात युद्धाची घोषणा करा;
बिन्यामीन आमचे नेतृत्व करा.
9एफ्राईम शासनाच्या
दिवशी ओसाड पडेल.
इस्राएली गोत्रात जे निश्चितच होणार
त्याची घोषणा करणार.
10यहूदाहचे पुढारी
सीमारेषांचे दगड हालविणारे झाले आहेत.
एखाद्या जलप्रलयाप्रमाणे
मी माझा संताप त्यांच्यावर ओतेन.
11एफ्राईम चिरडला गेला आहे,
न्यायात चेंगरलेला आहे.
कारण मूर्तीच्या मागे जाण्याचा त्याचा निश्चय आहे.
12एफ्राईमाला मी कसर,
आणि यहूदाहसाठी सडीचा रोग आहे.
13“ज्यावेळी एफ्राईमने त्याचा आजार पाहिला,
आणि यहूदाहने त्याची जखम पाहिली,
तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे वळला,
आणि महान राजाकडे मदतीसाठी विनंती केली.
परंतु तो तुला बरे करू शकत नाही,
तुझ्या जखमाही बर्या करू शकत नाही.
14कारण मी एफ्राईमला एखाद्या सिंहासारखा,
व यहूदाहला मोठ्या सिंहासारखा होईन.
मी त्यांना फाडून टाकीन आणि दूर निघून जाईन;
मी त्यांना घेऊन जाईन आणि त्यांना सोडविणारा कोणीही नसेल.
15ते आपला अपराध कबूल करेपर्यंत
व साहाय्यासाठी माझे मुख पुन्हा शोधेपर्यंत
मी आपल्या गुहेत परत जाईन—
कारण संकट आल्याबरोबर,
ते माझा शोध कळकळीने करतील.”
सध्या निवडलेले:
होशेय 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.