YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 22

22
यहूदीयाचा राजा अहज्याह
1यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली.
2वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती.
3तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले. 4अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या अपयशाचे ते सल्लागार झाले. 5त्याने त्यांच्या सल्ल्याप्रमाणेसुद्धा केले जेव्हा तो अरामचा राजा हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र यहोराम#22:5 किंवा योराम च्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला; 6रामाह#22:6 किंवा रामोथ येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला.
यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह#22:6 काही मूळ प्रतींमध्ये अजर्‍याह अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.
7अहज्याहची यहोरामाशी भेट यामधून परमेश्वराने अहज्याहचा नाश केला. जेव्हा अहज्याह तिथे आला तेव्हा तो योरामबरोबर निमशीचा पुत्र येहूला भेटण्यासाठी गेला, ज्याला अहाबाच्या घराण्याचा नाश करण्यासाठी याहवेह यांनी अभिषेक केला होता. 8येहू अहाबाच्या घराण्याचा न्यायनिवाडा करीत असताना, त्याला यहूदाहचे अधिकारी आणि अहज्याहकडे सेवा करण्याकरिता आलेले अहज्याहच्या नातेवाईकांची मुले भेटली तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. 9त्यानंतर तो अहज्याहचा शोध घेत गेला आणि त्याच्या माणसांनी त्याला पकडले तेव्हा तो शोमरोनमध्ये लपला होता, त्याला येहूकडे आणण्यात आले आणि ठार मारण्यात आले. त्यांनी त्याला पुरले, कारण ते म्हणाले, “तो यहोशाफाटचा पुत्र होता, ज्याने त्याच्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहचा सल्ला घेतला होता.” त्यामुळे अहज्याहच्या घरात राज्य टिकवून ठेवण्याइतके सामर्थ्य कोणातही नव्हते.
अथल्याह आणि योआश
10जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. 11परंतु यहोशेबा,#22:11 किंवा येहोशाबेथ यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही. 12अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 22: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन