YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 10

10
इस्राएलचे रेहोबोअमविरुद्ध बंड
1रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते. 2जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता. 3तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले: 4“तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू तुम्ही हलके करावे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करू.”
5रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.
6तेव्हा त्याचा पिता शलोमोनच्या जीवनकाळात त्यांची सेवा केलेल्या वडीलजनांना रेहोबोअम राजाने विचारले, तो म्हणाला, “या लोकांना मी काय उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटते?”
7त्यांनी उत्तर दिले, “जर तुम्ही या लोकांना दया दाखविली आणि त्यांना संतुष्ट केले व त्यांना अनुकूल उत्तर दिले, तर ते नेहमीच तुमचे सेवक म्हणून राहतील.”
8पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. 9त्याने त्यांना विचारले, “जे लोक मला म्हणतात, ‘तुझ्या पित्याने आमच्यावर घातलेले जू हलके करावे,’ त्यांना मी काय उत्तर द्यावे?”
10त्याच्याबरोबर वाढलेल्या तरुणांनी उत्तर दिले, “हे लोक तुम्हाला म्हणाले आहेत की, ‘तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता हे भारी जू तुम्ही हलके करावे.’ आता त्यांना सांग, ‘माझी करंगळी माझ्या पित्याच्या कमरेपेक्षाही जाड आहे. 11माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.’ ”
12तीन दिवसानंतर यरोबोअम व सर्व लोक रेहोबोअमकडे आले, कारण राजाने त्यांना सांगितले होते, “तीन दिवसांनी माझ्याकडे परत या.” 13वडील लोकांनी दिलेल्या सल्ल्याला नाकारत रेहोबोअम राजाने त्यांना कठोरपणे उत्तर दिले, 14तरुणांच्या सल्ल्याचे अनुसरण करीत तो म्हणाला, “माझ्या पित्याने तुमचे जू भारी केले; मी ते अजून भारी करेन. माझ्या पित्याने तुम्हाला चाबकाने मारले; तर मी तुम्हाला विंचवांनी मारीन.” 15अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे परमेश्वराने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.
16राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले:
“दावीदामध्ये आमचा काय वाटा,
इशायच्या मुलाशी आमचा काय भाग,
इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन!
दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!”
असे म्हणत इस्राएलचे सर्व लोक परत घरी गेले. 17परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.
18हदोराम#10:18 काही मूळ प्रतींनुसार अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला. 19याप्रकारे इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन