YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 27

27
सेनेचे विभाग
1इस्राएली लोकांची यादी—कुटुंबप्रमुख, हजार सैनिकांचा अधिकारी आणि शंभर सैनिकांचा अधिकारी आणि त्यांचे मुख्य अधिकारी, दरवर्षी प्रत्येक महिन्यात राजाच्या सर्व लष्करी सेवेसाठी या सैन्य विभागांना बोलाविले जात असे. प्रत्येक विभागात 24,000 पुरुष सैनिक असत.
2पहिल्या विभागाचा, पहिल्या महिन्याचा सेनापती जब्दीएलाचा पुत्र याशबआमच्या विभागामध्ये 24,000 पुरुष होते. 3तो पेरेसाच्या वंशातील होता आणि त्याच्या नेतृत्वाची सैन्य तुकडी पहिल्या महिन्यात कामावर असे.
4अहोही दोदय हा दुसर्‍या महिन्याच्या विभागाचा सेनापती होता; मिकलोथ त्यांचा मुख्य अधिकारी होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
5तिसर्‍या महिन्याच्या सैन्य विभागाचा सेनापती, प्रमुख याजक यहोयादाचा पुत्र बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते. 6बेनाइयाह दावीदाच्या सैन्यातील पहिल्या तीस योद्ध्यापैकी एक व त्या तिसांचा अधिकारी होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद सैन्य तुकडीचा सेनापती होता.
7चौथ्या महिन्याचा चवथा सेनापती योआबाचा भाऊ असाहेल होता; त्याच्यानंतर त्याचा पुत्र जबद्याह त्याच्या जागी आला. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
8पाचव्या महिन्याचा पाचवा सेनापती इज्राही शम्हूथ होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
9सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
10सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस होता, तो एफ्राईमी असून पलोन येथील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
11आठव्या महिन्याचा आठवा सेनापती जेरह कुळातील हुशाथी सिब्बखय होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
12नवव्या महिन्याचा नववा सेनापती बिन्यामीन अनाथोथी अबिएजेर होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
13दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती माहाराई, नटोफाथी जेरही होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
14अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती पिराथोनचा एफ्राईमी बेनाइयाह होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
15बाराव्या महिन्याचा बारावा सेनापती नटोफाथी हेल्दय असून तो ओथनिएलाच्या कुटुंबातील होता. त्याच्या विभागात 24,000 पुरुष सैनिक होते.
गोत्रप्रमुख
16इस्राएलांचे गोत्रप्रमुख हे होते:
रऊबेन गोत्रावर: जिक्रीचा पुत्र एलिएजर;
शिमओनी गोत्रावर: माकाहचा पुत्र शफात्याह;
17लेवी गोत्रावर: कमुवेलाचा पुत्र हशब्याह;
अहरोन गोत्रावर: सादोक;
18यहूदाह गोत्रावर: दावीद राजाचा बंधू अलीहू;
इस्साखार गोत्रावर: मिखाएलचा पुत्र ओमरी;
19जबुलून गोत्रावर: ओबद्याहचा पुत्र इश्मायाह;
नफताली गोत्रावर: अज्रीएलचा पुत्र यरिमोथ;
20एफ्राईमच्या गोत्रावर: अजज्याहचा पुत्र होशेय;
मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: पदायाहचा पुत्र योएल;
21गिलआदातील मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रावर: जखर्‍याहचा पुत्र इद्दो;
बिन्यामीन गोत्रावर: अबनेरचा पुत्र यासीएल;
22दान गोत्रावर: यरोहामाचा पुत्र अजरएल.
हे सर्व इस्राएलचे गोत्रप्रमुख होते.
23दावीदाने शिरगणती केली, तेव्हा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा त्या गणतीमध्ये समावेश केला नव्हता, कारण याहवेहने इस्राएली लोकांची संख्या आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करण्याचे वचन दिले होते. 24जेरुइयाहचा पुत्र योआबाने गणती सुरू केली, परंतु तो ती पूर्ण करू शकला नाही. कारण इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि गणतीची पूर्ण संख्या दावीद राजाच्या इतिहासात लिहिली गेली नाही.
राजाचे पर्यवेक्षक
25अदिएलाचा पुत्र अजमावेथ राजाचा भांडारपाल होता.
उज्जीयाहचा पुत्र योनाथान इस्राएलातील सर्व सीमापार नगरे, गावे आणि किल्ले यांचा विभागीय भांडारपाल होता.
26कलूबाचा पुत्र एज्री राजाच्या जमिनीची लागवड करणार्‍या कामकर्‍यांवर अधिकारी होता.
27रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता.
जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता.
28गदेर येथील बआल-हानान राज्याच्या पश्चिमी डोंगरपायथ्यातील जैतुनाच्या व उंबराच्या झाडांची देखरेख करत असे.
योआश जैतून तेलाच्या पुरवठ्याचा प्रमुख होता.
29शारोनाच्या मैदानात चरणार्‍या कळपांवर शारोनी शित्रेय देखरेख करत असे.
खोर्‍यातील कळपांवर अदलयचा पुत्र शाफाट हा देखरेख करत असे.
30इश्माएली प्रांतातला ओबील उंटांवर देखरेख करत असे.
गाढवांवर मेरोनोथी यहदायाह देखरेख करत असे.
31मेंढरांवर हगरी येथील याजीज देखरेख करत असे.
हे सर्व दावीद राजाच्या मालमत्तेवर देखरेख ठेवणारे अधिकारी होते.
32दावीदाचा चुलता योनाथान हा सुशिक्षित असून उत्तम सल्लागार व लेखनिक होता.
हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांचा शिक्षक होता.
33अहीथोफेल राजाचा सल्लागार होता.
हूशाई अर्की खाजगी सल्लागार होता.
34बेनाइयाहचा पुत्र यहोयादा आणि अबीयाथार नंतर अहीथोफेल त्यांच्या जागी आला.
योआब राजाच्या शाही सेनेचा सरसेनापती होता.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 27: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन