YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 26

26
द्वारपाल
1द्वारपालांचे विभाजन:
कोरहा पासून:
कोरही पुत्र मशेलेम्याह, आसाफाचा एक पुत्र होता. 2मशेलेम्याहचे पुत्र:
जखर्‍याह प्रथमपुत्र, यदिएल दुसरा,
जबद्याह तिसरा, यथनिएल चौथा,
3एलाम पाचवा, यहोहानान सहावा
व एलिओएनाइ सातवा.
4ओबेद-एदोमासही पुत्र होते:
शमायाह प्रथमपुत्र, यहोजाबाद दुसरा,
योवाह तिसरा, साखार चवथा,
नथानेल पाचवा, 5अम्मीएल सहावा,
इस्साखार सातवा व पउलथय आठवा.
(कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला.)
6ओबेद-एदोमाचा पुत्र शमायाहला सुद्धा पुत्र झाले, ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते, कारण ते सक्षम पुरुष होते. 7शमायाहचे पुत्र:
अथनी, रफाएल, ओबेद, एलजाबाद;
आणि त्यांचे बंधू अलीहू आणि समख्याह हे सक्षम पुरुष होते.
8हे सर्व ओबेद-एदोमाचे वंशज होते; ते आणि त्यांचे कुटुंब हे सर्वच सक्षम—काम करण्यास समर्थ पुरुष होते—ओबेद-एदोमाचे वंशज, सर्व मिळून 62.
9मशेलेम्याहचे पुत्र व नातेवाईक सुद्धा शूर पुरुष होते—सर्व मिळून 18.
10मरारी होसाहचे पुत्र:
शिम्री पहिला (तो प्रथमपुत्र नसतानाही त्याच्या पित्याने त्याला पुढारी नेमले).
11हिल्कियाह दुसरा, तबालियाह तिसरा,
जखर्‍याह चौथा.
होसाहचे पुत्र व नातेवाईक मिळून एकंदर 13.
12ज्याप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्याच प्रकारे सर्व विभाजित द्वारपालांना त्यांच्या पुढार्‍यांव्दारे याहवेहच्या मंदिराची सेवा देण्यात आली. 13प्रत्येक द्वारांसाठी, लहान थोर सारखेच समजून त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.
14पूर्वेकडील द्वारासाठी शेलेम्याहच्या#26:14 किंवा मशेलेमाह नावाची चिठ्ठी निघाली.
उत्तरेकडील द्वाराची त्याचा पुत्र जखर्‍याहकडे गेली, जो एक बुद्धिमान सल्लागार होता.
15दक्षिणेकडील द्वार ओबेद-एदोम आणि त्याच्या पुत्रांच्या ताब्यात कोठारे दिली गेली.
16पश्चिमेकडील द्वाराची व शल्लेकेथ द्वाराशी चढून जाण्याच्या मार्गावर पहारा देण्याची जबाबदारी शुप्पीम व होसाह यांच्याकडे आली.
द्वारपाल पहारेकऱ्यांसह उभे असत:
17पूर्वेच्या द्वारासाठी रोज सहा लेवी,
उत्तरेच्या द्वारासाठी चार रक्षक,
दक्षिणेच्या द्वारासाठी चार रक्षक
आणि भांडारावर एकाच वेळी प्रत्येकी दोन.
18न्यायालयाच्या पश्चिमेकडील द्वारांसाठी मार्गावर चार व न्यायालयात दोन रक्षक.
19हे द्वारपालांचे विभाजित वर्ग कोरही आणि मरारी वंशातील होते.
खजिनदार व इतर अधिकारी
20अहीयाह लेवीस परमेश्वरासाठी मंदिराचे खजिनदार आणि वाहिलेल्या अर्पणांची देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले.
21लादानाचे वंशज, जे लादान गेर्षोनी होते व जे गेर्षोनी लादानाचे यहीएली कुटुंबप्रमुखांचा समावेश होता. 22यहीएलीचे पुत्र जेथाम आणि त्याचा भाऊ योएलना याहवेहच्या मंदिराच्या खजिन्यावर अधिकारी नेमले होते.
23अम्रामी पासून इसहारी हेब्रोनी व उज्जीएली:
24मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता. 25एलिएजरपासून त्याचे नातेवाईक: त्याचा पुत्र रहब्याह, त्याचा पुत्र यशायाह, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिक्री, व त्याचा पुत्र शेलोमीथ.
26(हा शेलोमीथ आणि त्याचे नातेवाईक दावीद राजाने, हजार सैनिकांचे, शताधिपतींच्या आणि इतर सैनिकांच्या सेनाधिकारींचे कुटुंबप्रमुख, या सर्वांनी अर्पण केलेल्या भांडार वस्तूंची काळजी घेत. 27लढाईतील काही लूट याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्पण करीत. 28शमुवेल संदेष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर आणि जेरुइयाहचा पुत्र योआब यांनी अर्पण केलेले सर्वकाही आणि इतर अर्पणे सांभाळण्याची जबाबदारी शेलोमीथ आणि त्याच्या नातेवाईकांवर टाकण्यात आली.)
29इसहार्‍यांपैकी:
कनन्याह आणि त्याचे पुत्र यांची नेमणूक मंदिरापासून दूर इस्राएली लोकांवर अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
30हेब्रोन्यांपैकी:
हशब्याह आणि त्याचे नातेवाईक 1,700 सक्षम पुरुष यार्देन नदीच्या पश्चिमेकडील इस्राएलाच्या प्रदेशाचे प्रमुख होते. याहवेहची आणि राजाची सेवा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 31हेब्रोन्यातील यरीयाह हा त्यांच्या वंशावळीच्या नोंदीनुसार त्यांचा कुटुंबप्रमुख होता.
(दावीद राजाच्या शासनकाळात चाळिसाव्या वर्षी शिरगणतीत शोध घेण्यात आला. गिलआदामधील हिब्रोनी याजेरमध्ये सक्षम पुरुष आढळून आले. 32येरीह कडे 2,700 कुटुंब होते, जे सक्षम असून कुटुंबप्रमुख होते. दावीद राजाने त्यांना रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र यांच्या परमेश्वरा संबंधित धार्मिक व सामाजिक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले.)

सध्या निवडलेले:

1 इतिहास 26: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन