YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 25

25
मंदिराचे संगीतकार
1दावीद व निवासमंडपाचे अधिकारी यांनी आसाफ, हेमान व यदूथूनच्या काही पुत्रांना सतारी, वीणा व झांजा वाजवून संदेशाची सेवा करण्यासाठी वेगळे केले. त्यांच्या सेवेनुसार त्यांची यादी अशी आहे:
2आसाफच्या पुत्रा मधून:
जक्कूर, योसेफ, नथन्याह आणि अशारेलाह. राजाच्या देखरेखीत आसाफ संदेश देत असे, त्याच्या देखरेखीत त्याचे पुत्र कार्य करीत.
3यदूथून व त्याचे पुत्र:
गदल्याह, सरी, यशायाह, शिमी, हशब्याह आणि मत्तिथ्याह, सर्व मिळून सहाजण, संदेश देणारे त्यांचे पिता यदूथूनच्या नेतृत्वाखाली वीणा वाजवून याहवेहचे उपकारस्मरण व स्तवन करीत असत.
4हेमान व त्याचे पुत्र:
बुक्कीयाह, मत्तन्याह, उज्जीएल, शबुएल आणि यरिमोथ; हनन्याह, हनानी, अलियाथाह, गिद्दल्ती, रोमामती-एजेर; योश्बेकाशाह, मल्लोथी, होथीर आणि महजिओथ हे होते. 5(हे सर्व राजाचा संदेष्टा हेमानचे पुत्र होते. परमेश्वराने दिलेल्या अभिवचनानुसार त्याला हा कर्णा देण्यात आला होता. परमेश्वराने हेमानाला चौदा पुत्र आणि तीन कन्या दिल्या.)
6हे सर्वजण याहवेहच्या मंदिरात आपल्या पित्याच्या नेतृत्वाखाली झांजा, सतारी व वीणा वाजवून परमेश्वराच्या भवनात सेवा करीत असत.
आसाफ, यदूथून व हेमान राजाच्या नेतृत्वाखाली कार्य करीत. 7ते आणि त्यांच्या घराण्यातील सर्वजण म्हणजे एकंदर 288 गायनकला शिकून याहवेहसाठी संगीत देण्यात कुशल झाले होते. 8तरुण वा वयस्कर, तसेच शिक्षक वा शिष्य या सर्व गायकांची चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जाई.
9पहिली चिठ्ठी निघाली आसाफ, योसेफ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12#25:9 वचन 7 मध्ये एकूण संख्या पहा; हिब्रूमध्ये संख्या 12 नाहीत.,
दुसरी गदल्याहची, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
10तिसरी जक्कूरा, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
11चौथी इज्री,#25:11 किंवा झेरी त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
12पाचवी नथन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
13सहावी बुक्कीयाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
14सातवी यसारेलाह,#25:14 किंवा असारेलाह त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
15आठवी यशायाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
16नववी मत्तन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
17दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
18अकरावी अजरएल,#25:18 किंवा उस्सीएल त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
19बारावी हशब्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
20तेरावी शूबाएल, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
21चौदावी मत्तिथ्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
22पंधरावी यरेमोथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
23सोळावी हनन्याह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
24सतरावी योश्बेकाशाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
25अठरावी हनानी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
26एकोणविसावी मल्लोथी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
27विसावी एलियाथाह, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
28एकविसावी होथीर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
29बाविसावी गिद्दल्ती, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
30तेविसावी महजिओथ, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,
31चोविसावी रोमामती-एजेर, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन