YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 12

12
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना
मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे.
विश्वासू गायब झाला आहे.
2प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो,
प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
3परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
4हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,
जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
5परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो;
ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
6परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,
पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
7हे परमेश्वरा, तुच त्यांना #आम्हाससांभाळशील,
या पिढीपासून तू त्यांना #आम्हाससर्वकाळ राखशील.
8मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 12: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन