YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 11

11
सरळतेने चालणाऱ्याचा आधार
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;
पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा,
असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
2कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून,
दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
3कारण जर पायेच नष्ट केले,
तर न्यायी काय करणार?
4परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे;
त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
5परमेश्वर नितीमानाची पारख करतो.
परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
6तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील,
दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
7कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे.
सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 11: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन