मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे. परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही, अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात. पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे. जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे. परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो. तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.
1 शमु. 2 वाचा
ऐका 1 शमु. 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 शमु. 2:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ