YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 2:1-8

१ शमुवेल 2:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे. परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही, अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात. पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे. जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे. परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो. तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.

सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा

१ शमुवेल 2:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली: “माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे; याहवेहमध्ये माझे शिंग उंच केलेले आहे. माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते, कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते. “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही. “फार गर्वाने बोलत राहू नका, किंवा तुमच्या तोंडाला उद्धट बोलणे करू देऊ नका, कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत, आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात. “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत, परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत. ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत, परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत. जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे, परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे. “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात. गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात. ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्‍यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते.

सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा

१ शमुवेल 2:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही; गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो. शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत; जे लटपटत होते त्यांच्या कंबरेस बलरूप कमरबंद चढवला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे क्षुधित होते त्यांना आता आराम प्राप्त झाला आहे; वंध्येला सात मुले झाली आहेत; बहुपुत्रवती क्षीण झाली आहे. परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो. परमेश्वर निर्धन करतो व धनवानही करतो; तो अवनत करतो व उन्नतही करतो. तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.

सामायिक करा
१ शमुवेल 2 वाचा

१ शमुवेल 2:1-8

१ शमुवेल 2:1-8 MARVBSI१ शमुवेल 2:1-8 MARVBSI१ शमुवेल 2:1-8 MARVBSI१ शमुवेल 2:1-8 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा