YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 85

85
देवाने इस्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी; कोरहपुत्रांचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर प्रसन्न झाला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
2तू आपल्या लोकांच्या अनीतीची क्षमा केली आहेस, त्यांच्या सर्व पापांवर पांघरूण घातले आहेस.
(सेला)
3तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.
4हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण; आणि आमच्यावरील आपला रोष नाहीसा कर.
5तू आमच्यावर सर्वकाळ कोपलेला राहणार काय? पिढ्यानपिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवणार काय?
6तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय?
7हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे, व तू सिद्ध केलेले तारण आम्हांला दे.
8परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील; मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
9खरोखर त्याचे भय धरणार्‍यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.
10दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे;
11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.
12जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल.
13त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 85: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन