स्तोत्रसंहिता 84
84
देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ
मुख्य गवयासाठी; गित्ती चालीवर गायचे कोरहपुत्रांचे स्तोत्र.
1हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!
2माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारीत आहेत.
3हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करण्यास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधण्यास स्थळ मिळाले आहे.
4तुझ्या घरात राहणार्यांची केवढी धन्यता! ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील.
(सेला)
5ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सीयोनेच्या राजमार्गांचा ध्यास लागला आहे तो केवढा धन्य!
6शोकजनक1 खोर्यातून जाताना ते त्यांना झर्यांचे स्थानच वाटते; आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो.
7ते अधिकाधिक शक्ती पावत जातात, सीयोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते.
8हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे.
(सेला)
9हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
10खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.
11कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
12हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य!
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 84: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.