YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 83

83
इस्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना
एक गीत; आसाफाचे संगीतस्तोत्र.
1हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस.
2कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.
3ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात.
4ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”
5कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;
6तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी,
7गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;
8अश्शूरही त्यांना सामील झाला आहे; त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे.
(सेला)
9मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केलेस, तसे त्यांना कर;
10ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.
11ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर.
12ते म्हणतात, “देवाची निवासस्थाने2 आपल्या ताब्यात घेऊ या.”
13हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्‍याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.
14अग्नी वनाला भस्म करतो, ज्वाला डोंगराला आग लावते,
15त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
16हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.
17ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत;
18म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 83: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन