YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 108

108
शत्रूंविरुद्ध साहाय्याची याचना
(स्तोत्र. 57:7-11; 60:5-12)
दाविदाचे संगीतस्तोत्र.
1हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी गाईन, मी जिवेभावे स्तोत्र गाईन.
2हे सतारी, हे वीणे, जागृत व्हा; मी प्रभातेला जागे करीन.
3हे परमेश्वरा, लोकांमध्ये मी तुझे उपकारस्मरण करीन; राष्ट्रांमध्ये तुझी स्तोत्रे गाईन.
4कारण तुझी दया आकाशाहून उंच आहे, व तुझे सत्य गगनापर्यंत आहे.
5हे देवा, आकाशाहून तू उन्नत हो; तुझा गौरव सर्व पृथ्वीभर होवो.
6तुझ्या प्रिय जनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक.
7देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, “मी उल्लास पावेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;
8गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे.
9मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; पलेशेथाविषयी मी जयघोष करीन.”
10मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल?
11हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.
12शत्रूंपासून तू आमची सुटका कर; कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.
13देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू; तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 108: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन