YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 12

12
स्तुतिगीत
1त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.
2पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”
3तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल.
4त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.
5परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.
6अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”

सध्या निवडलेले:

यशया 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन