YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 2

2
ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई
1माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा.
2ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे.
3ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.
4शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे.
5जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत.
6श्रम करणार्‍या शेतकर्‍याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
7जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल.
8माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव.
9ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्‍यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.
10ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.
11हे वचन विश्वसनीय आहे की,
जर आपण त्याच्याबरोबर मेलो,
तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.
12जर आपण धीराने सोसतो,
तर त्याच्याबरोबर राज्यही करू;
आपण त्याला नाकारू,
तर तोही आपल्याला नाकारील;
13आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो,
कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.
देवाला पटलेला कामकरी
14तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्‍यांच्या नाशास कारण होते.
15तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.
16अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील;
17आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल; त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत;
18ते सत्याविषयी चुकले आहेत; पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात.
19तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”
20मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.
21म्हणून जर कोणी त्यांपासून दूर राहून स्वत:ला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.
22तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.
23मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यांपासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे.
24प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील,
25विरोध करणार्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे; कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चात्तापबुद्धी देईल,
26आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील.

सध्या निवडलेले:

2 तीमथ्य 2: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन