YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 6

6
दास
1जे दास म्हणून जोखडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे; ह्यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये;
2आणि ज्यांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.
खोटे शिक्षण व खरी संपत्ती ह्यांविषयी
3जर कोणी अन्य तर्‍हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करत नाही,
4तर तो गर्वाने फुगलेला आहे; त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे; ह्यांपासून1 हेवा, कलह, अपशब्द, दुसर्‍यांविषयीचे दुष्ट संशय उत्पन्न होतात;
5मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणार्‍या माणसांची एकसारखी भांडणे होतात; [त्यांच्यापासून दूर राहा.]
6चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे.
7आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही;
8आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.
9परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणार्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.
10कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.
सद्‍बोध
11हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग.
12विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.
13सर्व प्राणिमात्राला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमक्ष स्वतःविषयी चांगला पत्कर केला, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,
14आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राख.
15जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही,
16आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.
17प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.
18चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे;
19जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करावा.
20हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा.
21ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. तुझ्याबरोबर कृपा असो.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 6: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन