YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 5

5
हीराम राजाबरोबर शलमोनाचा करार
(२ इति. 2:1-18)
1काही दिवसांनी सोरचा राजा हीराम ह्याने आपले सेवक शलमोनाकडे पाठवले; शलमोनाचा अभिषेक होऊन तो आपल्या बापाच्या जागी गादीवर बसल्याचे वर्तमान त्याने ऐकले होते; हीराम व दावीद ह्यांची अखंड मैत्री होती.
2शलमोनाने हीरामास सांगून पाठवले की,
3“माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे.
4पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही.
5पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद ह्यांना म्हटले होते की, “तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील.” त्याप्रमाणे मी करणार आहे.
6तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.”
7शलमोनाचा हा निरोप ऐकून हीरामास फार आनंद झाला व तो म्हणाला, “ह्या थोर राष्ट्रावर राज्य करण्यासाठी दाविदाला असा शहाणा पुत्र ज्याने दिला आहे त्या परमेश्वराचा आज मी धन्यवाद करतो.”
8हीरामाने शलमोनाला सांगून पाठवले की, “आपण पाठवलेला निरोप मी ऐकला; गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करतो.
9माझे चाकर ती लाकडे लबानोनाहून समुद्रापर्यंत नेतील; तेथे त्याचे तराफे करून जे ठिकाण आपण मला नेमून द्याल तेथे जलमार्गाने ती मी पोचती करीन; तेथे ती मी सोडवून ठेवीन; मग तेथून ती आपण घेऊन जा; माझ्या घरच्या सेवकांना अन्नसामग्री पुरवली म्हणजे पुरे.”
10शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली.
11शलमोनाने हीरामाच्या घरच्या सेवकांना निर्वाहासाठी वीस हजार कोर गहू आणि वीस मापे निर्भेळ तेल पुरवले; हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शलमोन हीरामास करीत असे.
12परमेश्वराने आपल्या वचनानुसार शलमोनाला शहाणपण दिले; हीराम व शलमोन ह्यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करारमदार केले.
13शलमोन राजाने सर्व इस्राएलातल्या लोकांवर बिगार बसवली, ही बिगार तीस हजार मनुष्यांची होती.
14लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्‍यांवर होता.
15शलमोनाचे सत्तर हजार ओझेकरी आणि पहाडांवर ऐंशी हजार पाथरवट होते.
16शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी तीन हजार तीनशे अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करण्यास नेमले होते.
17मंदिराचा पाया घडीव चिर्‍यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मोलवान पाषाण खोदून काढण्यात आले.
18शलमोनाचे व हीरामाचे कारागीर आणि गिबली लोक ह्यांनी ते घडवले; मंदिर बांधण्यासाठी लाकडे व चिरे त्यांनी तयार केले.

सध्या निवडलेले:

१ राजे 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन