१ राजे 4
4
शलमोनाचे सरदार व अधिकारी
1शलमोन राजा सर्व इस्राएलाचा राजा होता.
2त्याचे सरदार हे होते : सादोकाचा पुत्र अजर्या याजक,
3शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक);
4यहोयादाचा पुत्र बनाया सैन्यावर होता; सादोक व अब्याथार हे याजक होते.
5नाथानाचा पुत्र अजर्या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता;
6अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्यांवर होता.
7शलमोनाचे बारा कमावीसदार असत; ते सर्व इस्राएलावर नेमलेले असून राजाला व त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे.
8त्यांची नावे ही : एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशात बेन-हूर;
9माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन-बेथ-हानान ह्यांत बेन-देकर;
10अरुबोथात बेन हेसेद (ह्याच्याकडे सोखो व हेफेर प्रदेश होते);
11दोरच्या सर्व पठारात बेन-अबीनादाब (शलमोनाची कन्या टाफाथ ही त्याची स्त्री होती);
12तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;
13रामोथ-गिलादात बेन-गेबेर होता (ह्याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर ह्याची गिलादातली गावे होती; ह्याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत ह्यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली साठ मोठी नगरे त्याच्याकडे होती);
14इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाइमात होता;
15नफतालीत अहीमास हा होता (त्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी विवाह केला होता);
16आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता;
17इस्साखारात पारूहाचा पुत्र यहोशाफाट हा होता;
18बन्यामिनात एलाचा पुत्र शिमी हा होता;
19ऊरीचा पुत्र गेबेर हा गिलादात होता; ह्या एवढ्या देशात तो एकटाच कमावीसदार होता. हा देश पूर्वी अमोर्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग ह्यांचा होता.
शलमोनाचे ज्ञान आणि त्याची समृद्धी
20यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.
21महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले.
22शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे : तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ;
23दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी.
24महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे.
25दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते.
26रथांच्या घोड्यांची चाळीस हजार ठाणी व बारा हजार स्वार शलमोन बाळगून होता.
27शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत.
28रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे.
29देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.
30शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.
31तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली.
32त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली.
33त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले.
34पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.
सध्या निवडलेले:
१ राजे 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.