युहन्ना 20

20
रिकामी कबर
(मत्तय 28:1-10; मार्क 16:1-8; लूका 24:1-12)
1रविवारच्या दिवशी मोठ्या सकाळी अंधार असतांना मगदला गावची मरिया, अन् काई दुसऱ्या बाया संग कब्रेवर आल्या, अन् गोट्याले कबरेच्या दरवाज्या पासून सरकलेला पायलं. 2तवा कोणी पयत शिमोन पतरस अन् दुसऱ्या शिष्यापासी ज्याच्यावर येशू प्रेम करत होता, येऊन म्हतलं, “कोणी प्रभूच्या मेलेल्या शरीराले कब्रेतून काढून घेऊन गेले हाय; अन् आमाले नाई मालूम, कि कोणी ते कुठीसा ठेवलं हाय.” 3तवा पतरस अन् तो दुसरा शिष्य निघून कबरेच्या इकळे गेले. 4अन् ते दोघे संग-संग पऊन रायले होते, पण दुसरा शिष्य पतरसच्या पहिले कब्रेवर पोहचला. 5अन् वाकून फक्त कपडे पडलेले दिसले तरी पण तो अंदर नाई गेला. 6तवा शिमोन पतरस त्याच्या मांग-मांग पोहचला, अन् कबरेच्या अंदर गेला, अन् फक्त मलमलच्या कपड्याच्या चादरीले पडलेलं पायलं. 7अन् तो तोंडाच्यावर गुडांवलेला कपडा, मलमलच्या कपड्याच्या चादरी संग नाई होता, पण बाजुले एका जाग्यावर गुंडून ठेवलेला पायलं. 8तवा दुसरा शिष्य जो कब्रेवर पहिले पोहचला होता, अंदर गेला अन् पाऊन कि येशू मेलेल्यातून जिवंत झाला हाय विश्वास केला. 9येशूच्या बाऱ्यात पवित्रशास्त्रात हे खरोखर लिवलेल हाय, कि तो आपल्या मरणातून परत जिवंत होईन, पण ते आतापरेंत ह्या गोष्टीले नाई समजले होते. 10तवा हे शिष्य आपल्या घरी वापस चालले गेले.
मरिया मगदाली ले दर्शन
(मार्क 16:9-11)
11पण मरिया रडत कबरे पासी बायरच उभी रायली अन् रडत-रडत कबरेच्या इकळे वाकून, 12दोन देवदूतायले पांढरे फटक कपडे घातलेले एकाले उशाजवळ अन् दुसऱ्याले पायथ्याजवळ बसलेले पायलं, जती येशूचा मेलेलं शरीर ठेवलं होतं. 13देवदूतायन मरियाले म्हतलं, “हे बाई, तू कावून रडत हाय?” तीन देवदूतायले म्हतलं, “ते माह्या प्रभूच शरीर घेऊन गेले हाय, अन् मले नाई मालूम कि ते कुठीसा ठेवलं हाय.” 14हे म्हतल्यावर मरिया मांग फिरली अन् येशूले उभं पायलं अन् ओयखलं नाई कि हा येशू हाय. 15येशूनं तिले म्हतलं, “हे बाई तू कायले रडते? कोणाले पायत हाय?” तीन माळी हाय असं समजून त्याले म्हतलं, “दादा जर तू त्याच्या शरीराले उचलून नेलं अशीन तर मले सांग त्याले कुठी ठेवलं हाय अन् मंग मी त्याले घेऊन जाईन.” 16येशूनं तिले म्हतलं, “मरिया!” तीन मांग पाऊन त्याले इब्रानी भाषेत म्हतलं, “रब्बूनी” ज्याचा अर्थ होते, हे गुरुजी. 17येशूनं तिले म्हतलं, “माह्य पाय नको पकडू, कावून कि मी आतापरेंत देवबापापासी वरती गेलो नाई, पण माह्या भावाय पासी जाऊन त्यायले सांगून दे, कि मी माह्या बाप जो तुमचा बाप पण हाय अन् माह्या देव जो तुमचा देव पण हाय त्याच्यापासी जाऊन रायलो हाय.” 18मगदला गावची मरियानं जाऊन शिष्यायले सांगतल, “तीन प्रभूले पायले, अन् प्रभून तिच्या संग गोष्टी केल्या.”
शिष्यायले येशू दिसतो
19त्याचं रविवारच्या संध्याकाळी सगळे शिष्य सोबत एकत्र झाले, त्यायनं दरवाजे बंद केले, कावून कि ते यहुदी पुढाऱ्यायले भेले होते, तवा येशू आला अन् मधात उभा होऊन त्यायले म्हतलं, “तुमाले शांती मिळो.” 20अन् हे म्हणून येशूनं त्यायले, आपल्या हाताचे अन् आपल्या कुशीचे घाव दाखवले: तवा शिष्य प्रभूले पाऊन आनंदित झाले. 21येशूनं परत त्यायले म्हतलं, “तुमाले शांती मिळो; ज्याप्रकारे माह्या देवबापाने मले जगात पाठवले हाय, तसचं मी पण तुमाले जगातल्या लोकायपासी पाठवतो.” 22हे म्हणून येशूनं त्यायच्यावर फुक मारली, अन् त्यायले म्हतलं, “पवित्र आत्मा घ्या. 23ज्यायचे पाप तुमी क्षमा करा, त्यायचे पाप क्षमा केल्या जाईन; ज्यायचे पाप तुमी ठेवता ते आपल्या पापात बांधलेले रायतीन.”
पायने अन् विश्वास करणे
(मत्तय 28:16-20; मार्क 16:14-18; लूका 24:36-49)
24जवा येशू आला होता, बारा शिष्यायतून एक माणूस म्हणजे थोमा, ज्याले दिदुमुस म्हणतात, तवा तो त्या शिष्याय संग नाई होता. 25मंग जवा थोमा आला तवा दुसरे शिष्य त्याले म्हणत होते, “आमी प्रभूले पायलं हाय,” तवा थोमान त्यायले म्हतलं, “जोपरेंत मी त्याच्या हातात खिळ्याचा घाव नाई पायन, अन् खिळ्याच्या घावात स्वताच बोट नाई टाकीन, अन् त्याच्या पसलीत आपला हात टाकून जोपरेंत पायन नाई, तोपरेंत मी विश्वास नाई करणार कि तो मेलेल्यातून जिवंत झाला हाय.” 26एक हपत्याच्या नंतर येशूचे शिष्य परत घराच्या अंदर होते, अन् थोमा त्यायच्या सोबत होता, अन् दरवाज्या बंद होता, तवा येशूनं येऊन मधात उभा होऊन म्हतलं, “तुमाले शांती मिळो.” 27तवा येशूनं थोमाले म्हतलं, “आपले बोट घेऊन अती माह्याल्या हाताला पाय, पण आपला हात आणून माह्याल्या कुशीत टाक, अन् शंका करू नको, पण तू विश्वास कर, कि मी जिवंत हाय.” 28हे आयकून थोमान उत्तर देलं, “हे माह्या प्रभू, हे माह्या देवा!” 29येशूनं त्याले म्हतलं, “थोमा तू तर मले पाऊन विश्वास केला हाय? पण धन्य हायत ते ज्यायनं मले नाई पायले तरी पण विश्वास केला.”
हे पुस्तक योहानाने लिवली
30येशूनं आणखी लय चमत्कार शिष्याय समोर दाखवले, जे या पुस्तकात लिवल्या नाई गेले. 31पण हे याच्यासाठी लिवल्या गेलं हाय, कि तुमी विश्वास करत राहावं, कि येशूच देवाचा पोरगा, ख्रिस्त हाय: अन् त्याच्यावर विश्वास करून त्याच्या नावानं अनंत जीवन मिळेल.

നിലവിൽ തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നു:

युहन्ना 20: VAHNT

ഹൈലൈറ്റ് ചെയ്യുക

പങ്ക് വെക്കു

പകർത്തുക

None

നിങ്ങളുടെ എല്ലാ ഉപകരണങ്ങളിലും ഹൈലൈറ്റുകൾ സംരക്ഷിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടോ? സൈൻ അപ്പ് ചെയ്യുക അല്ലെങ്കിൽ സൈൻ ഇൻ ചെയ്യുക