प्रेषितस्ना काम 3

3
लंगडा भिकारी ले बर करन
1पेत्र आणि योहान दुफार ना तीन वाजता प्रार्थना ना टाईम ले परमेश्वर ना मंदिर मा जाई ऱ्हायंतात. 2तठे एक माणुस होता जो जन्मा पासून लंगळा होता, लोक तेले दररोज परमेश्वर ना मंदिर ना त्या दरवाजा वर जो सुंदर दरवाजा सांगामा येस, बठाळी देतस, कि तो मंदिर मा जाणारास पासून भिक मांगो. 3जव तेनी पेत्र आणि योहान ले परमेश्वर ना मंदिर मा जातांना देख, त तेनी तेस्ना पासून भिक मांग. 4पेत्र नि योहान ना संगे सरळ तेना कळे देखीसन सांग, “आमना कळे देख.” 5तो तेस्ना कळून काही भेटानी आशा कण तेस्ना कळे देखाले लागणा. 6तव पेत्र नि सांग, “चांदी आणि सोन त मना जोळे नई शे, पण जे मना जोळे शे, ते तुले देस, येशु ख्रिस्त नासरेथकर ना नाव मा उठ आणि चालू लाग.” 7मंग पेत्र नि तेना उजवा हात धरीसन तेले उठाळ, तव लगेच तेना पाय आणि गुळघास्मा शक्ती ईगयी. 8तो उडीमारीसन उभा रायग्या, आणि चालू फिरू लागणा, तव तो उड्यामारत-कुदत आणि परमेश्वर नि स्तुती करतांना तेस्ना संगे परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा ग्या. 9सर्वा लोकस्नी तेले चालता-फिरतांना आणि परमेश्वर नि स्तुती करतांना देखीसन, 10तेले ओयखी लीध कि हवू तोच लंगळा भिकारी शे, जो परमेश्वर ना मंदिर ना सुंदर दरवाजा जोळे बठीसन भिक मांगत ऱ्हात होता, आणि त्या घटना कण जी तेना संगे होयेल होती, त्या गैरा आश्चर्य आणि चकित हुई ग्यात.
मंदिर मा पेत्र ना उपदेश
11जव तो पेत्र आणि योहान ले घट्ट धरेल होता, त सर्वा लोक गैरा आश्चर्य करतांना त्या जागा वर जो शलमोन ना ओसारा सांगामा येस, तेस्ना कळे पयीसन उनात. 12हय देखीसन पेत्र नि लोकस्ले सांग, “हे इस्त्राएल देश ना लोकसहोण, तुमी या माणुस वर काबर आश्चर्य करतस, आणि तुमी आमना कळे काबर घुरतस, जसा कि आमी आपली सामर्थ्य व भक्ती कण तेले चालाना-फिराणा योग्य बनाई दिधा?” 13अब्राहाम, इसहाक, आणि याकोब ना परमेश्वर, आमना पूर्वज लोक ना परमेश्वर नि आपला दास येशु नि महिमा करी, पण तुमी तेले मारावा साठे यहुदी पुढारीस्ना हात मा सोपी दिधा, पण जव पिलात नि तेले सोळाना विचार कर, तव तुमी तेना समोर येशु ले नकार दिधा. 14तुमी येशु ले अस्वीकार करणात, जो पवित्र आणि धर्मी होता, आणि लोकस साठे पिलात ले सांगीसन एक हत्याराले सोळाव. 15तुमी तेले जो लोकस्ले कायम ना जीवन देस मारी टाक, जेले परमेश्वर नि मरेल मधून परत जित्ता कर, ह्या गोष्ट ना आमी साक्षी शेतस. 16ख्रिस्त येशु ना नाव वर विश्वास करा मुळे ह्या माणुस ले जेले तुमी ओयखतस आणि ह्या टाईम ले देखतस, परमेश्वर कळून सामर्थ्य भेटेल शे. हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव मा विश्वास ना द्वारे बरा चांगला हुयेल शे, जसा कि तुमी स्वता देखी सकतस. 17“आते हे भावूसहोण, मले माहित शे कि तुमी आणि तुमना पुढारीस्नी येशु ले अज्ञानता कण मारी टाकनात, कारण तुमले माहित नई होत कि तो ख्रिस्त शे.” 18पण ज्या गोष्टीस्ले परमेश्वर नि सर्वा भविष्यवक्ता ना द्वारे पयलेच सांगेल होत, कि तेना (परमेश्वर) कळून धाळेल ख्रिस्त दुख उचलीन आणि मारी टाकामा ईन, तेनी तेस्ले खर करी दाखाळ. 19एनासाठे, मन फिरावा आणि परमेश्वर कळे परत या कि तुमना पाप माफ करामा येवोत, तव परमेश्वर कळून आत्मिक सामर्थ्य ना टाईम ईन. 20आणि तो येशु ले धाळीन, जो तो ख्रिस्त शे जेले तेनी तुमना साठे पयलेच निवाळेल शे. 21येशु ले स्वर्ग मा त्या टाईम लोंग राहाले अवश्य शे जव परमेश्वर त्या सर्वा वस्तूस्ले नवीन बनाई दिन ज्या तेनी बनायेल शे, गैरा टाईम पयले परमेश्वर नि लोकस्ले सांगा साठे पवित्र भविष्यवक्तास्ना द्वारे असा कराना करार करना. 22जसा कि मोशे नि सांग, “प्रभु परमेश्वर तुमना भावूस मधून तुमना साठे मनासारखा एक भविष्यवक्ता धाडीन, जे काही तो तुमले सांगीन तेना आयकज्यात.” 23पण प्रत्येक माणुस जो त्या भविष्यवक्ता ना नई आयकाव, लोकस मधून नाश करामा ईन. 24शमुवेल पासून तेना नंतर लोंग जीतला भविष्यवक्तास्नी गोष्ट सांगणात त्या सर्वास्नी ह्या दिनस्नी प्रचार करेल शे. 25तुमी सर्वा भविष्यवक्तास्ना वारीस आणि त्या करार ना भागी शे, जो परमेश्वर नि तुमना पूर्वज लोक बरोबर बांधेल होता, जव तेनी अब्राहाम ले सांग, “तुना वंश ना द्वारा पृथ्वी ना सर्वा घरानास्ले आशीर्वाद भेटीन.” 26परमेश्वर नि आपला दास ले मरेल मधून उठाडीसन बठ्ठास्ना पयले तुमना जोळे धाळ, कि आमना मधून प्रत्येक ले आपला जीवन ना पापमय रिती कण परमेश्वर कळे फिराले मदत करो.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind