प्रेषितस्ना काम 4

4
महासभा ना समोर पेत्र आणि योहान
1जव पेत्र आणि योहान लोकस्ले हय सांगीच ऱ्हायंतात, त यहुदी पुजारी आणि परमेश्वर ना मंदिर ना सरदार आणि सदूकी तेस्ना वर चळी उनात. 2त्या गैरा रागे भरनात कि पेत्र आणि योहान येशु ना बारामा शिकाळत होतात कि ज्या लोक मरी जायेल शे परमेश्वर तेस्ले परत जित्ता करी दिन, जसा तेनी येशु ले मरेल मधून परत जित्ता करी दिधा. 3तेस्नी तेस्ले अटक करीसन दुसरा दिन लगून बंदीगृह मा ठेव कारण कि संज्याकाय हुई जालेल होती. 4पण संदेश ना आयकनारास मधून गैरास्नी येशु वर विश्वास कर, आणि तेस्नी गणती पाच हजार माणसस्ना आंगे पांगे हुईगी ज्या येशु वर विश्वास करणारा बनी ग्यात.
पेत्र आणि योहान यहुदी सभा ना समोर
5दुसरा दिन तेस्ना पुढारी, पूर्वज लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक यरूशलेम शहर मा एक जागा वर एकत्र हुईनात. 6ज्या लोक त्या सभा मा उपस्थित होतात, तेस्ना मा, हन्ना, केफा, योहान, सिकंदर आणि सर्वा महा यहुदी पुजारी परिवार मधला होतात. 7आणि पेत्र आणि योहान ले मधमा उभा करीसन विचारू लागनात, “ह्या माणुस ले बरा करासाठे कोणी तुमले सामर्थ्य आणि अधिकार दिधा?” 8तव पेत्र नि पवित्र आत्मा कण भरीसन तेस्ले सांग, 9“ओ लोकस्ना सरदारसहोण आणि पूर्वज लोकसहोण, आमी एक दुर्बल माणुस न चांगल करेल शे आणि आज आमनी चौकशी करी ऱ्हायनात कि तो कसा बरा हुईना. 10त तुमी सर्वा आणि सर्वा इस्त्राएल देश ना लोक समजी ल्या कि हय नासरेथकर येशु ख्रिस्त ना नाव कण करेल शे. त्याच येशु ले तुमी लोकस्नी क्रूस वर चळाई टाकेल होतात, पण परमेश्वर नि तेले मरेल मधून परत जित्ता कर. आज तेनाच नाव ना द्वारे हवू माणुस तुमना समोर चांगला उभा शे. 11ख्रिस्त येशु तोच दगड शे, जेले तुमी राजमिस्त्रीस्नी तुच्छ समज आणि तोच कोपरा ना मुख्य दगड#4:11 दगड कोनशिला हुईग्या. 12येशु ले सोळीसन कोणी दुसरा ना द्वारे तारण नई, कारण कि आकाश ना खाले माणसस्मा आखो कोणताच दुसरा नाव नई देवामा एयेल शे, जेना द्वारे आमी तारण प्राप्त करी सकुत.”
येशु ना नाव ना साठे शिष्यस्ले धमकी
13जव त्या पेत्र आणि योहान नि हिम्मत देखनात, आणि हय समजी ग्यात कि बिगर शिकेल आणि साधारण माणस शेतस, त आश्चर्य करणात, नंतर तेस्ले ओयख, कि ह्या येशु ना संगे ऱ्हायेल होतात. 14पण त्या माणुस ले जो बरा हुयेल होता, पेत्र आणि योहान ना संगे उभा देखीसन, पुढारी, पूर्वज लोक आणि यहुदी नियम ना शिक्षक (शास्त्री) तेस्ना विरुद्ध मा काहीच नई करू सकनात. 15पण तेस्ले महासभा ना बाहेर जवानी आज्ञा दिसन, त्या आपस मा विचार कराले लागनात, 16“आमी ह्या माणसस संगे काय करूत? कारण कि यरूशलेम शहर ना सर्वा राहणारास वर प्रगट शे, कि एस्ना द्वारे एक प्रसिद्ध चिन्ह दाखाळेल शे, आणि आमी तेना नकार नई करू सकतस. 17पण लोकस्मा हय बातमी आजून जास्त पसराले नको, आमी तेस्ले धमकावूत, कि त्या ह्या नाव कण परत कोणी माणुस संगे गोष्टी नई करोत.” 18तव पेत्र आणि योहान ले परत बलाईसन आणि जताळीसन हय सांगामा उन, “येशु ना नाव कण काय बी नका सांगज्यात आणि नईत शिकाळज्यात.” 19पण पेत्र आणि योहान नि तेस्ले उत्तर दिधा, “तुमीच न्याय करा, कि काय हय परमेश्वर ना जोळे चांगला शे, कि आमी परमेश्वर नि गोष्ट ले सोळीसन तुमनी गोष्ट मानी लेवूत? 20कारण कि आमी शांत नई राहू सकतस, आमनी जे देखेल आणि आयकेल शे, तेना बारामा आमी बोलत ऱ्हासुत.” 21तव तेस्नी तेस्ले आखो धमकाईसन सोळी टाक, कारण कि लोकस मुळे तेस्ले दंड देवाना कोणताच कारण नई भेटणा, एनासाठे कि जी घटना हुयेल होती तेना मुळे सर्वा लोक परमेश्वर नि स्तुती करत होतात. 22कारण कि जो माणुस चमत्कारी रूप मा बरा हुयेल होता, चाळीस वर्ष तून जास्त वय ना होता.
शिष्यस्नी प्रार्थना
23पेत्र आणि योहान सुटीसन आपला साथीस जोळे उनात, आणि जे काय मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि पूर्वज लोकस्नी तेस्ले सांगाले होत, तेस्ले आयकाळी दिध. 24हय आयकीसन, तेस्नी एक चित्त हुईसन उंच शब्द मा परमेश्वर ले सांग, “ओ प्रभु, तू तोच शे जेनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि जे काही तेस्ना मा शे बनाव.” 25तुनी पवित्र आत्मा ना द्वारे आपला सेवक आमना पूर्वज दाविद ना तोंड कण सांग, “दुसरा जातीस्ना लोक गोंधय करतस? आणि देश-देश ना लोक व्यर्थ गोष्टीस्ना काब विचार करतस? 26प्रभु आणि तेना ख्रिस्त ना विरुद्ध मा पृथ्वी ना राजा उभा ऱ्हायनात, आणि हाकीम एकत्र हुई ग्यात. 27कारण कि खरज तुना पवित्र सेवक येशु ना विरुद्ध मा, जेले तुनी अभिषेक कर, हेरोद राजा आणि पंतय पिलात बी बिगर यहुदी आणि इस्त्राएल देश ना लोकस संगे ह्या नगर मा एकत्र हुईनात, 28तेस्नी तेच कर जी तुनी सामर्थ्य आणि ईच्छा नि पयलेच ठरायेल होत कि तेच होवो. 29आते हे प्रभु, तेस्ना धमक्यास्ले आयक, आणि आपला दासस्ले हवू वरदान दे कि तुना वचन मोठी हिम्मत कण आयकाळोत. 30बरा करासाठे तू आपला हात वाळाव, कि चमत्कारी चिन्ह आणि अदभूत काम तुना पवित्र सेवक येशु ना नाव कण करामा येवो.” 31जव त्या प्रार्थना करी लीनात, त ती जागा जठे त्या एकत्र होतात हाली गई, आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि परमेश्वर ना वचन हिम्मत कण आयकाळत ऱ्हायनात.
विश्वासीस्ना सामुहिक जीवन
32विश्वास करणारास्नी मंडळी एक चित्त आणि एक मन नि होती, आठ लोंग कि कोणी बी आपली संपती आपली नई सांगत होता, पण सगळ काही आपस मा वाटी लेत होतात. 33प्रेषित मोठी सामर्थ्य कण प्रभु येशु ना परत जित्ता हुई जावाना साक्ष देत ऱ्हायनात आणि त्या सर्वास्वर मोठी कृपा होती. 34तेस्ना मा कोणी बी गरीब नई होता, कारण कि जेस्ना कळे जमीन व घर होतात, त्या तेस्ले ईकी-ईकीसन, ईकायेल वस्तुना दाम लयत होतात, आणि प्रेषितस्ले दि टाकत होतात. 35आणि जशी जेले गरज होती, त्या प्रमाणे प्रत्येक ले वाटी टाकत होतात. 36योसेफ नाव ना एक माणुस होता, तो लेवी गोत्र मधून होता आणि कुप्र बेट ना होता. प्रेषितस्नी तेले बर्णबा सांगनत, जेना अर्थ शे, एक असा माणुस जो दुसरास्ले उत्साहित करस. 37तेनी काही जमीन होती, जिले तेनी ईक, आणि दाम ना पैसा लईसन प्रेषितस्ले दि टाक एनासाठे कि त्या लोकस्ले वाटी सकोत.

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind