YouVersion Logo
Search Icon

लुका 5

5
येशूचा पायला शिष्य
(मत्तय 4:18-22; मार्क 1:16-20)
1एक दिवस येशू जवा गनेसरच्या समुद्राच्या काटावर उभा होता, तवा तती लोकायची एक मोठी गर्दी जमा झाली, अन् देवाचं वचन आयक्याले त्याच्यावर येऊन पडत होती, अन् तवा असं झालं. 2कि त्यानं समुद्राच्या काटावर दोन डोंगे बाजुले लावलेले पायले, अन् त्यानं पायलं कि काई मासोया पकडणारे डोंग्यातून खाली उतरून जाळे धुऊन रायले होते. 3त्या डोंग्याय पैकी एक डोंगा जो शिमोनचा होता, त्याच्यावर चढून, येशूनं शिमोनाले विनंती केली, कि “काटावरून थोडसाक अंदर घे,” तवा तो बसला, अन् लोकायले डोंग्यातून उपदेश देऊ लागला. 4जवा येशूनं लोकायच्या गर्दी सोबत बोलणं संपवल, तवा त्यानं शिमोनाले म्हतलं, “खोल पाण्यात डोंग्याले जाऊ दे, अन् मासोया पकळ्याले आपले जाळं टाका.” 5शिमोनानं त्याले उत्तर देलं, “हे गुरुजी आमी सऱ्या रात्रभर मेहनत केली, पण आमी काईच मासोया पकडल्या नाई, तरी पण तू म्हणते, म्हणून जाळं टाकतो.” 6जवा त्यायनं तसं केलं तवा मासोयाचा मोठा गोयंका त्यायच्या जाळ्यात आला, अन् त्यायचं जाळं फाटु लागलं, 7तवा त्यायनं आपल्या संग च्यायले जे दुसऱ्या डोंग्यात होते, त्यायले खुणावून म्हतलं, की येऊन आमची मदत करा तवा त्यायनं येऊन त्यायची मदत केली अन् दोन्ही डोंगे एवढे भरले कि ते डुबणार होते. 8हे चमत्कार पाऊन शिमोन पतरसन येशूच्या पाया लागून म्हतलं, “प्रभू जी, माह्यापासून चालले जा कावून कि मी पापी माणूस हाय!” 9कावून कि एवढ्या मासोयाले पकडल्याने त्याले अन् त्याच्या संग च्यायले आश्चर्य वाटलं होतं; 10तसचं शिमोनाच्या संगचे याकोब अन् योहान, जे जब्दीचे पोरं होते, त्यायले पण आश्चर्य वाटलं, तवा येशूनं शिमोनाले म्हतलं, “भेऊ नोको, आतापरेंत तुमी मासोया पकळनारे होते, पण आज पासून मी तुमाले हे शिकवतो की लोकायले माह्या जवळ विश्वासात कसं आणावं.” 11अन् त्यायनं डोंगे किनाऱ्यावर लावल्यावर सर्व सोडून ते त्याच्या मांग गेले.
कुष्ठरोगीले चांगलं करणे
(मत्तय 8:1-4; मार्क 1:40-45)
12जवा येशू एका गावात होता, तवा तती एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला, अन् त्याच्या पुढे येऊन टोंगे टेकून त्यानं त्याले विनंती केली, “हे प्रभू, जर तुह्यी इच्छा अशीन तर मले बरं करू शकते.” 13तवा त्यानं हाताले पुढं करून त्याले स्पर्श केला अन् म्हतलं, “माह्यावाली इच्छा हाय, कि तू बरा हून जाय.” अन् तवाच तो कुष्ठरोगाने एकदम चांगला झाला. 14मंग येशूनं त्याले चिताऊन म्हतलं, “कोणाले पण हे गोष्ट सांगू नको, पण स्वताले जाऊन याजकाले दाखवं, अन् तू चांगल्या झाल्यावर जे काई मोशेनं आपल्या नियमशास्त्रात कऱ्याले लावलं हाय त्याच्या अनुसार देवाले बलिदान अर्पण कर की लोकायले माईत व्हावं की तू बरा झाला हाय.” 15पण त्या विषायाची चर्चा अजूनच पसरली, अन् बऱ्याचं लोकायची गर्दी त्याचं आयक्याले अन् बिमारीतून चांगलं होण्यासाठी तती जमा झाली. 16पण येशू सुनसान जागेवर जाऊन प्रार्थना करत होता.
येशू कडून लकव्याच्या रोग्याले चांगलं करणे
(मत्तय 9:1-8; मार्क 2:1-12)
17एका दिवशी असं झालं की, जवा येशू उपदेश देऊ रायला होता, तवा गालील प्रांतातल्या अन् यहुदीया प्रांतातल्या हरएक गावातून, अन् यरुशलेम शहरातून आलेले परुशी व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक तती बसलेले होते; अन् रोग चांगलं कऱ्याची देवाची सामर्थ्य येशू पासी होती. 18तवा काई लोकायन त्याच्यापासी एका लकव्याच्या रोगी माणसाले बाजीवर घेऊन आले, अन् ते त्याले घराच्या अंदर घेऊन जाऊन त्याच्या समोर ठेव्याच्या उपाय शोधून रायले होते. 19पण गर्दीच्यानं ते त्याले येशू पासी घेऊन जाऊ शकले नाई, म्हणून त्यायनं तो जती उभा होता ततीच घरावरचे कवलं काढून, अन् ज्या बाजीवर तो लकव्याचा रोगी झोपला होता, त्याले ततून खाली येशू समोर उतरवले. 20तवा येशूनं त्या चार लोकायचा विश्वास पाऊन त्या लकव्याच्या माणसाले म्हतलं, “पोरा, मी तुह्या पापाले क्षमा करतो.” 21तवा बरेचसे मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं अन् परुशी विचार करू लागले कि “हा कोण हाय, जो देवाची निंदा करते? देवावाचून कोणीचं पापायची क्षमा करू शकत नाई.” 22तवा येशूनं त्यायच्या मनातल्या गोष्टी जाणून, त्यायले म्हतलं, “तुमी तुमच्या मनात असा विचार नाई करायला पायजे. 23यातून माह्यासाठी कोणतं सोपे हाय? तुह्या पापाची क्षमा झाली हाय, असं लकव्याच्या माणसाले म्हणनं की असं म्हणनं कि उठ, आपली बाज उचलून चाल फिर? 24पण मी, जो माणसाचा पोरगा हावो, पृथ्वीवर लोकायच्या पापाची क्षमा कऱ्याचा अधिकार हाय.” तवा त्यानं लकव्याच्या माणसाकड़े फिरून पायलं अन् म्हतलं. “मी तुले सांगतो, उठ आपली बाज उचलून आपल्या घरी चालला जाय.” . 25तो लगेचं त्यायच्या समोरून उठला ज्याच्यावर तो पडून होता, ते उचलून घेऊन देवाचा गौरव करत आपल्या घरी गेला. 26तवा ते सरे जन हापचक झाले अन् देवाचा गौरव करू लागले, अन् लय भेऊन म्हणाले, “आमी आज चमत्काराचे काम पायले हायत.”
मत्तयले बलावन
(मत्तय 9:9-13; मार्क 2:13-17)
27मंग येशू बायर गेला, तवा त्यानं लैवी नावाच्या एका कर घेणाऱ्याले पायलं, जो हल्फईचा पोरगा होता, तो आपल्या जकात घेणाऱ्या नाक्यावर बसला होता, तवा येशूनं त्याले पाऊन म्हतलं, “माह्या संग ये अन् माह्य अनुकरण कर.” 28तवा तो सर्व काई सोडून उठला, अन् त्याच्यावाल्या मांग गेला.
पापी लोकायसोबत जेवण
29येशू अन् त्याचे शिष्य लैवीच्या घरी रात्रीचं जेवण करून रायले होते, त्या ठिकाणी लय जकातदार व पापी लोकं जेव्याले पंगतीत बसलेले होते, कावून की ते लय होते. 30तवा परुशी अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं येशूच्या शिष्यायले हे म्हणून कुरकुर कराले लागले, “तुमी पापी अन् करवसुली करणाऱ्या लोकायबरोबर कावून जेवण करता?”
उपासावर येशूच मत
31येशूनं त्यायले उत्तर देलं, “कि निरोगी लोकायले वैद्याची (डॉक्टराची) गरज नाई, पण रोगी लोकायले गरज हाय. 32पण मी धर्मी लोकायले नाई पण पापी लोकायचे आपल्या पापापासून मन फिरवायले आलो हाय.” 33मंग एक दिवस, काई लोकाईन येऊन येशूले विचारलं, “योहानाचे शिष्य अन् परुशी लोकं तर बरोबर उपास करतेत, अन् प्रार्थना करतेत, पण तुह्ये शिष्य कावून खातेत अन् पितेत?” 34-35तवा येशूनं त्यायले म्हतलं, “जोपरेंत माह्यावाले शिष्य माह्या संग हायत ते उपास कसे करतीन? कावून की ते खुश हायत, जसे एका नवरदेवाचे मित्र लग्नात आनंद करतात, तवा ते त्या दिवसात उपास करत नाई. पण जवा ते दिवस येईन जवा नवरदेव त्यायच्या पासून दूर जाईन, तवा ते त्या दिवसात उपास करतीन.” 36त्यानं एक कथा पण त्यायले सांगतली “कोणी माणूस नव्या कपड्यातून फाडून जुना कपड्याले थीगय नाई लावत, तसं केलं तर, नवीन कपडा फाटून जाईन अन् जुन्या कपड्या सोबत तो जुडणार पण नाही. 37नव्या अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवत नाई, पण जर नवीन अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवलं तर चामळ्याच्या थयल्या फुटतात, अन् अंगुराचा रस नाश होते. 38म्हणून नवीन अंगुराचा रस नवीन चामळ्याच्या थयल्यात ठेवतात. 39कोणी माणूस जुना अंगुराचा रस पेऊन, नव्याची इच्छा करत नाई, कावून कि तो म्हणते जुनाच उत्तम हाय.”

Currently Selected:

लुका 5: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in