YouVersion Logo
Search Icon

लुका 6

6
येशू आरामाच्या दिवसाचा प्रभू
(मत्तय 12:1-8; मार्क 2:23-28)
1मंग येशू अन् त्याचे शिष्य आरामाच्या दिवशी वावरातून जाऊन रायले होते, अन् त्याचे शिष्य गवाच्या उंम्भा तोडून हातावर चोऊन-चोऊन खाऊन रायले होते. 2अन् तवा परुशी लोकायतून काई जन असे म्हणून रायले होते, “हे आरामाच्या दिवशी जे काम करायले नाई पायजे ते काम करून रायले हाय, हे आमच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध हाय.” 3येशूनं त्यायले उत्तर देलं, “काय तुमी वाचलं नाई जवा दाविद राजाने अन् त्याच्या सोबत्यायले भूक लागली होती, तवा त्यायनं काय केलं? 4तो कसा देवाच्या मंडपात गेला, अन् ज्या समर्पित भाकरी याजका शिवाय कोणीस नाई खाऊ शकत त्या दाविदान खाल्ल्या अन् त्याच्या संगच्या सोबत्यायले पण देल्या, मोशेच्या नियमानुसार फक्त देवाच्या याजकालेच ती भाकर खाण्याची परवानगी हाय.” 5अन् येशूनं त्यायले म्हतलं, “माणसाचा पोरगा आरामाच्या दिवसावर अधिकार ठेवतो.”
आरामाच्या दिवशी रोग्याला बरं करणे
(मत्तय 12:9-14; मार्क 3:1-6)
6-7असं झालं कि एका आरामाच्या दिवशी येशू धार्मिक सभास्थानात जाऊन शिकवून रायला होता, अन् तती एक माणूस होता, ज्याचा उजवा हात लुला होता. तवा काई परुशी लोकं मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं येशूच्या चुका काढ्याचा प्रयत्न करत होते, म्हणून ते त्याले ध्यान देऊन पाह्यतं होते, की तो आरामाच्या दिवशी त्याले चांगलं करते की नाई. 8पण तो त्यायच्या विचारायले ओयखत होता, म्हणून येशूनं त्या लुल्या हाताच्या माणसाले म्हतलं, “उठ, अन् सगळ्या लोकायच्या मधात उभा राहा, की लोकायन तुले पायलं पायजे.” अन् तो उठून उभा झाला. 9येशूनं त्यायले विचारलं, “आरामाच्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्रानुसार लोकायले चांगलं करन या बेकार करनं, जीव वाचवन या मारन यातून चांगलं कोणत हाय?” 10तवा त्यानं चारही इकून त्या सगळ्यायले पाऊन त्या माणसाले म्हतलं, “आपला हात लंम्बा कर,” त्यानं तसचं केलं, अन् तवाच त्याचा हात बरा झाला. 11अन् मंग ते स्वःता नियंत्रणाच्या बायर जाऊन आपसात विवाद करू लागले, कि आमी येशूच्या संग काय करू,
बारा प्रेषित
(मत्तय 10:1-4; मार्क 3:13-19)
12या नंतर येशू जवळच्या एका पहाडावर प्रार्थना कराले गेला, अन् देवबापा संग पूर्ण रात्र प्रार्थना केली. 13अन् जवा सकाळ झाली, तवा त्यानं आपल्या शिष्यायले बलाऊन त्यायच्यातून बारा जनायले निवडलं अन् त्यायले प्रेषित म्हणून नाव देलं. 14अन् ते हे हाय: शिमोन त्यानं त्याले पतरस हे पण नाव देलं, त्याचा भाऊ आंद्रियास, अन् याकोब, योहान अन् फिलिप्पुस, अन् बरत्तूल्मे 15अन् मत्तय, अन् थोमा अन् हल्फईचा पोरगा याकोब, अन् शिमोन ज्याले जेलोतेस म्हणतात. 16अन् याकोबचा पोरगा यहुदा अन् यहुदा इस्कोरोती जो त्याले पकडून देणारा बनला.
येशूच लोकायले उपदेश देणं अन् चांगलं करणे
(मत्तय 4:23-25; 5:1-12)
17तवा तो त्यायच्या संग उतरून सफाट जाग्यावर येवून उभा झाला, अन् त्याच्या शिष्यायची लय गर्दी, अन् यहुदीया प्रांतातले, यरुशलेम शहरातले, अन् सूर व सैदा नगराच्या समुद्र किनाऱ्या जवळचे लय लोकं 18त्याचं आयक्याले अन् आपल्या बिमारीतून चांगलं होयाले त्याच्यापासी आले होते, ते तती होते. अन् भुत आत्म्यापासून सतावलेले लोकं पण तती चांगले हून जात होते. 19अन् सगळे लोकायले त्याले स्पर्श करायची इच्छा होती, कावून कि त्याच्यातून सामर्थ निघून सगळ्यायले चांगलं करत होती.
आशीर्वादाचे वचन
20तवा त्यानं आपल्या शिष्यायकडे पावून म्हतलं, कि “धन्य हायत, ते ज्याईले वाटते कि त्यायले देवाची आवश्यक्ता हाय, कावून कि देवाचं राज्य त्यायचं हाय.” 21“धन्य हायत तुमी जे आता उपासी हा, कावून कि तुमी तृप्त केल्या जासान.” “धन्य आहा तुमी जे आता रडतात, कावून कि तुमी हासान.” 22“धन्य हा तुमी, जे माणसाच्या पोराच्या कारण लोकं तुमच्या संग द्वेष करतीन अन् तुमाले बायर काढून देतीन, अन् तुमची निंदा करतीन, अन् तुमचं नाव बेकार समजून कापून टाकतीन.” 23“त्या दिवशी लय आनंदित होऊन उड्या मारजा, कावून कि तुमच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ हाय” यायचे पूर्वज पण भविष्यवक्त्याच्या संग असचं करत होते.
दुख वचन
24“तुमी जे धनवान हा, तुमच्यासाठी भयंकर दंड असणार कावून कि तुमी स्वताचा आनंद घेतला हाय.” 25“तुमच्यासाठी किती भयानक होणार, कावून कि ज्यायच्यापासी सगळे काई हाय, जे तुमाले आवळते, तरीही उपासी असणार.” “तुमच्यासाठी किती भयानक असणार, जे हासता, कावून कि तुमी दुखी व्हाल अन् रडसान.” 26“तुमच्यासाठी किती भयानक होणार, जवा सगळे माणसं तुमाले चांगलं म्हणतेत, कावून कि तुमच्या पूर्वजायन पण खोट्या भविष्यवक्त्याच्या बाऱ्यात चांगल्या गोष्टी म्हतल्या हाय.”
वैऱ्यावर पण प्रेम करणे
(मत्तय 5:38-48; 7:12)
27“पण मी तुमाले आयकणाऱ्यायले म्हणतो कि आपल्या वैऱ्यावर पण प्रेम करा, जो तुमचा द्वेष करतीन, त्यायचं चांगलं करा. 28जो तुमाले शाप देईन, त्याले आशीर्वाद द्या; जो तुमचा अपमान करीन, त्याच्यासाठी प्रार्थना करा. 29जो तुमच्या एका गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे. अन् जो तुह्या मनिला हिसकावीन, त्याले तुह्या सदरा पण घ्याले म्हणा करू नको. 30अन् जो कोणी तुले मांगत अशीन त्याले द्या, अन् जो कोणी तुह्यावाली वस्तु हिसकन त्याले वापस मांगू नको.” 31अन् जसं तुमाले वाटते कि लोकायन तुमच्या संग केलं पायजे, तुमी पण त्यायच्या सोबत तसाच व्यवहार करत जा. 32“जर तुमी आपल्या प्रेम करणाऱ्या संगच प्रेम करान, तवा तुमी कोणत मोठं काम केलं? कावून कि पापी लोकं पण आपल्या प्रेम करणाऱ्यावर प्रेम करते. 33अन् जर तुमी आपल्या चांगलं करणाऱ्यावाल्या संगच चांगलं करान, तर तुमी कोणत मोठं काम केलं? कावून कि पापी लोकं पण असचं करतात.
34कावून कि जर तुमी त्याले उधार देसान तर त्याच्या कडून वापस भेटीन म्हणून आशा ठेवता, तर तुमी कोणत मोठं काम केलं? इथपरेंत कि पापी लोकं पापी लोकायले उधार देत असते, कावून कि त्यायले वापस भेटन. 35पण आपल्या शत्रूवर प्रेम करा, अन् त्यायचं चांगलं करा, अन् मंग वापस भेटलं नाई पायजे म्हणून उधार द्या; तवा तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ अशीन; अन् तुमी परमप्रधान देवाचे लेकरं होसान, कावून तो त्यायच्यावर जो धन्यवाद नाई करत, अन् बेकार लोकायवर पण कृपा करते. 36जसा तुमचा देवबाप दयाळू हाय, तसेच तुमी पण दयाळू बना.”
दोष नका लावू
(मत्तय 7:1-5)
37“दोष नका लावू, म्हणजे तुमच्यावर पण दोष लावला जाणार नाई: कोणाले पण दोषी नका ठरवा, तवा तुमी पण दोषी ठरवल्या जाणार नाई, तुमी दुसऱ्यायले क्षमा करा तर तुमाले पण क्षमा केल्या जाईन. 38देत जासाल तर तुमाले पण देल्या जाईन: लोकं पूर्ण माप दाबून-दाबून अन् हालवून-हालवून अन् शिग भरून तुमच्या पदरात टाकतीन, कावून कि ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन.” 39मंग येशूनं त्यायले एक कथा सांगतली कि “एक फुटका दुसऱ्या फुटक्याले रस्ता दाखऊ शकत नाई, असं झालं तर ते दोघही गड्यात पडतीन. 40शिष्य आपल्या गुरु पेक्षा मोठा नाई, पण जो परिपूर्ण अशीन तो जवा आपलं प्रशिक्षण पूर्ण करणार तवा तो गुरु सारखा होईन. 41तू कावून आपल्या भावाच्या लहान-लहान चुका पायतो, आपल्या सोताच्या मोठ्या-मोठ्या चुका तुले दिसत नाई काय? 42जवा तुह्याल्या जीवनात एवढ्या मोठ्या चुका हाय, तवा तू आपल्या भावाले कसा म्हणू शकतो, हे भावा, थांब मी तुह्याले दोष दूर करून तुह्यावाली मदत करतो. हे कपटी पयले आपल्या जीवनातले दोष दूर कर, तवा तू आपल्या भावाच्या जीवनातले दोष मोठ्या हक्कान दूर करू शकशीन.”
झाडाची ओयख फळापासून
(मत्तय 7:17-20; 12:34-35)
43“कोणत्याही चांगल्या झाडाले, बेकार फळ येणार नाई, अन् बेकार झाडाले, चांगलं फळ येणार नाई. 44हरएक झाड आपल्या फळापासून ओयखल्या जाते; कावून कि लोकं झुडपासून अंगुर या काटेरी झाडापासून अंजीर तोडत नाई. 45एक चांगला माणूस आपल्या चांगल्या मनाच्या खज्याण्यातून चांगल्या गोष्टी काढतो, अन् बेकार माणूस आपल्या बेकार मनाच्या खज्याण्यातून बेकार गोष्टी काढते; कावून कि जे मनात भरून हाय तेच तोंडावर येते.”
घर बनवणारे दोन प्रकारचे माणसं
(मत्तय 7:24-27)
46“जवा तुमी माह्यी गोष्ट नाई आयकतं, तर मले हे प्रभू हे प्रभू कायले म्हणता? 47जो कोणी माह्यापासी येते, अन् माह्याली गोष्ट आयकून त्याले मानते, मी तुमाले सांगतो, कि तो कोण्या सारखे हाय? 48तो त्या माणसा सारखा हाय, ज्यानं घर बांध्याच्या वाक्ती जमीन खोल खोदुन गोट्यावर पाया टाकला, अन् मंग जवा पूर आला, तवा पाण्याची धार त्या घराले लागली पण त्या घराले हालवू शकली नाई; कावून कि ते गोट्यावर बांधलं होतं. 49पण जो कोणी माह्याली गोष्ट आयकून नाई मानत तो त्या माणसा सारखा हाय, ज्यानं जमिनीवर पाया न टाकता घर बांधला अन् मंग जवा त्याच्यावर पाण्याची धार लागली तवा तो लवकरच पडून गेला, अन् पडून पूर्ण सत्यानाश झाला.”

Currently Selected:

लुका 6: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in