स्तोत्रसंहिता 148
148
अखिल निर्मितीने उपकारस्तुती करण्याचा आदेश
1परमेशाचे स्तवन करा!1 आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा; उर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा.
2अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो, त्याचे स्तवन करा; त्याच्या सर्व सैन्यांनो, त्याचे स्तवन करा;
3अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्यांनो, त्याचे स्तवन करा.
4आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो, त्याचे स्तवन करा.
5ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली.
6त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.
7पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा; मोठेमोठे जलचर व सर्व जलाशय,
8अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ,
9पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
10वनपशू व सर्व ग्रामपशू सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी,
11पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश,
12कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण
13ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे.
14आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे;2 तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्राएलाच्या संततीला स्तुतिपात्र आहे. परमेशाचे स्तवन करा!1
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 148: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.