YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 130

130
परमेश्वराच्या द्वारे मिळणार्‍या तारणाविषयी आशा
आरोहणस्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे.
2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.
3हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?
4तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.
5मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
6पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्‍या पहारेकर्‍यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
7हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे;
8तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 130