YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 129

129
सीयोनेच्या शत्रूंचा पाडाव व्हावा म्हणून प्रार्थना
आरोहणस्तोत्र.
1आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;”
2“माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही.
3नांगरणार्‍यांनी माझी पाठ नांगरली; त्यांनी आपल्या नांगरांनी लांबलांब तासे काढली.”
4परमेश्वर न्यायी आहे; दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडली.
5जे कोणी सीयोनेशी वैर करतात ते फजीत होवोत आणि मागे फिरोत.
6धाब्यांवरचे गवत जसे वाढण्यापूर्वीच सुकून जाते तसे ते होवोत;
7कापणार्‍याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणार्‍याच्या कवेत ते भरत नाही.
8जवळून येणारेजाणारे त्यांना एवढेसुद्धा म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हांला प्राप्त होवो, परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हांला आशीर्वाद देतो.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in