YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 131

131
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे
दाविदाचे आरोहणस्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही.
2खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे.
3हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 131