YouVersion Logo
Search Icon

यशया 16

16
1अधिपतीस पाठवायचा कोकरांचा नजराणा तुम्ही रानाजवळचे सेला येथून सीयोनकन्येच्या पर्वताकडे रवाना करा.
2कारण कोट्यांतून उडवलेल्या भटकणार्‍या पाखरांप्रमाणे मवाबाच्या कन्या आर्णोनच्या उतारांजवळ भटकतील.
3“मसलत दे, निर्णय कर; भरदुपारी आपली छाया रात्रीसारखी कर; घालवून दिलेल्यांना लपव, भटकणार्‍यांना दाखवून देऊ नकोस.
4माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.
5वात्सल्याचे सिंहासन स्थापले आहे; त्यावर दाविदाच्या डेर्‍यात कोणीएक सत्यनिष्ठ विराजमान होईल; तो न्याय करणारा, न्यायप्रिय, नीतिमत्तेत निपुण असा असेल.”
6मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.
7ह्यास्तव मवाब स्वतःविषयी विलाप करील; सर्व लोक शोक करतील, कीर-हरेसेथाच्या मनुकांच्या ढेपांविषयी1 अगदी निराश होऊन तुम्ही उसासा टाकाल.
8हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या.
9म्हणून मी याजेराच्या विलापाप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षलतेविषयी विलाप करतो; हे हेशबोना, हे एलाले, मी आपल्या अश्रूंनी तुम्हांला न्हाऊ घालीन. कारण उन्हाळ्यातील तुझ्या फळांच्या व पिकांच्या हंगामाच्या वेळी रणशब्द कानी पडला.
10सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला; द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढत नाही; द्राक्षांच्या हंगामातला उत्सवशब्द मी बंद केला आहे.
11ह्यामुळे माझी आतडी मवाबासाठी, माझे काळीज कीर-हरेसासाठी वीणेप्रमाणे नाद करीत आहे.
12मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.
13मवाबाविषयी गतकाळी परमेश्वराने जे वचन विदित केले ते हे :
14आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”

Currently Selected:

यशया 16: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in