YouVersion Logo
Search Icon

यशया 17

17
दिमिष्काविषयी देववाणी
1दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.
2अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.
3एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
इस्राएलाचा न्याय
4त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.
5कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्‍यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.
6तरी जैतून झाड हलवले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, वरच्या फांदीवर दोनतीन व त्याच्या अगदी बाहेर पसरलेल्या बहुफल शाखांवर चारपाच राहतात, तसा त्यांचा शेष राहील, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.
7त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील.
8आपल्या हातांनी बनवलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही; आपल्या बोटांनी घडलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती ह्यांकडे तो पाहणार नाही.
9त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील.
10कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;
11ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्‍या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.
12अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!
13राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.
14संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.

Currently Selected:

यशया 17: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in