YouVersion Logo
Search Icon

१ शमुवेल 31

31
शौल आणि त्याचे मुलगे ह्यांचा मृत्यू
(१ इति. 10:1-12)
1पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.
2पलिष्ट्यांनी शौलाचा व त्याच्या पुत्रांचा पाठलाग निकराने करून, शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब1 व मलकीशुवा ह्यांचा वध केला.
3शौलाशी निकराची लढाई झाली; तिरंदाजांनी त्याला गाठले; त्यांच्यामुळे तो फार हैराण झाला.
4तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.
5शौल मेला हे पाहून त्याचा शस्त्रवाहकही आपल्या तलवारीवर पडून त्याच्याबरोबर मेला.
6ह्या प्रकारे शौल, त्याचे तिघे पुत्र, त्याचा शस्त्रवाहक व त्याचे सर्व लोक एकाच दिवशी एकदम मृत्यू पावले.
7खोर्‍यांच्या पलीकडे आणि यार्देनेच्या पलीकडे जे इस्राएल लोक होते त्यांनी पाहिले की इस्राएल लोक पळाले आहेत आणि शौल व त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा तेही आपापली नगरे सोडून पळाले आणि पलिष्टी लोक त्यांत जाऊन राहिले.
8दुसर्‍या दिवशी मारलेल्या लोकांना नागवण्यास पलिष्टी आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.
9तेव्हा त्यांनी शौलाचे शिर छेदले, त्याची हत्यारे लुटली आणि आपल्या देशात सर्वत्र जासूद पाठवून त्यांच्या देवळांत व लोकांत हे वर्तमान पसरवले.
10त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ-शानच्या गावकुसावर टांगले.
11पलिष्ट्यांनी शौलाचे काय केले ते याबेश-गिलादाच्या रहिवाशांनी ऐकले;
12तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले, आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते बेथ-शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली.
13त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरल्या आणि सात दिवस उपास केला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for १ शमुवेल 31