तरी बी मी तुमले खर सांगस, कि मन जावान तुमाना साठे चांगल शे, कारण कि जर मी नई जानार, त तो मदत करणारा तुमना नई येवाव, पण जर मी जासू, त तेले तुमना जोळे धाळसू. तो ईसन संसार ना लोकस्ले पाप, धार्मिकता आणि परमेश्वर ना न्याय ना बारामा साबित करीन कि त्या चूकीन शे.