युहन्ना 11
11
लाजर चे मरण
1बेथानी गावात रायणारा लाजर नावाचा एक माणूस बिमार होता, बेथानी ते गाव होते, जती मरिया अन् तिच्यावाली बहिण मार्था रायत होती. 2हे तेच मरिया होती, जिने प्रभूच्या पायावर सुंगधीत तेल टाकून आपल्या केसानं विचारलं होतं, तिचाच भाऊ लाजर बिमार होता. 3तवा त्याच्यावाल्या दोघी बहिणीन येशूले निरोप पाठवला, “हे प्रभू, पाय, ज्याच्यावर तू प्रेम करतो, तो बिमार हाय.” 4हे आयकून येशूनं म्हतलं, “हे बिमारी मारण्यासाठी नाई हाय, पण देवाच्या गौरवासाठी हाय, कि त्याच्या कडून देवाच्या पोराचा गौरव झालं पायजे.” 5येशू व मार्था अन् त्याचीवाली बहिण अन् लाजरावर प्रेम करत होता. 6मंग जवा त्यानं आयकलं, कि तो बिमार हाय, तवा ज्या जागी तो होता, तती दोन दिवस आणखी थांबला. 7दोन दिवसानंतर त्यानं शिष्यायले म्हतलं, “या, आपण परत यहुदीया प्रांतात जाऊ.” 8शिष्यायनं त्याले विचारलं, “हे गुरुजी, आताच तर यहुदी पुढारी तुह्यावर गोटे फेकाले पायत होते, अन् तुले परत ततीसाच जायची इच्छा हाय?” 9येशूनं उत्तर देलं, “दिवसाचे बारा घंटे रायते, जर कोणी दिवसा चालीन तर तो ठोकर नाई खाणार, कावून कि तो ह्या जगाचा ऊजीळ पाहत हाय. 10पण जो कोणी रात्री चालते, तो ठोकर खाते, कावून कि त्याच्या जवळ कोणताच ऊजीळ नाई.” 11येशूनं ह्या गोष्टी म्हतल्या, अन् याच्यानंतर त्यायले म्हणू लागला, “आपला मित्र लाजर झोपलेला हाय, पण मी त्याले उठव्याले जाऊन रायलो.” 12तवा शिष्यायनं त्याले म्हतलं, “हे प्रभू, जर तो झोपला हाय, तर चांगला होवून जाईन.” 13येशूनं तर त्याच्या मरणाच्या बद्दल म्हतलं होतं: पण ते समजले कि त्यानं झोपण्याच्या बद्दल म्हतलं हाय. 14तवा येशूनं त्यायले साप-साप म्हतलं, “लाजर मेला हाय. 15अन् मी तुमच्यासाठी आनंदित हावो, कि मी ततीसा नाई होतो, ज्याच्याने तुमी विश्वास करावं. पण आता या, आपण त्याच्यापासी जाऊ,” 16तवा थोमान, जो दिदुमुस म्हतल्या जाते, आपल्या संगच्या शिष्यायले म्हतलं, “या, आपण पण त्याच्या सोबत मऱ्याले जाऊ.”
येशू पुनरुस्थान अन् जीवन
17मंग येशू जवा बेथानी गावात आला, तवा त्याले हे मालूम झालं, कि लाजर ले मरून चार दिवस झाले हाय. 18बेथानी गाव यरुशलेम शहरापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर होतं. 19अन् लय सारे यहुदी लोकं मार्था अन् मरिया पासी त्यायच्या भावाच्या बाऱ्यात सांत्वन द्यासाठी आले होते. 20मार्था येशूची येण्याची बातमी आयकून त्याची भेट घ्यायले गेली, पण मरिया घरात बसून रायली. 21मार्थान येशूले म्हतलं, “हे प्रभू, तुले अती असाले पायजे होतं; तर माह्या भाऊ मेला नाई असता. 22अन् आता पण मले माईत हाय, कि जे तू देवाले मांगसीन, देव तुले देईन.” 23येशूनं तिले म्हतलं, “तुह्या भाऊ परत जिवंत होईन.” 24मार्थान त्याले म्हतलं, “मले माईत हाय, न्यायाच्या दिवशी जवा सगळे लोकं जिवंत होतीन तवा तो पण परत जिवंत होईन.” 25येशूनं तिले म्हतलं, “मी तोचं हाय जो मेलेल्या लोकायले परत जिवंत करतो, जो कोणी माह्यावर विश्वास करते, जर तो मेला तरी जिवंत राईन. 26अन् जो माह्यावर विश्वास करते अन् जिवंत हाय, ते कधी नाई मरणार; काय तू या गोष्टीवर विश्वास करते?” 27मार्थान त्याले म्हतलं, “हो, हे प्रभू, मी विश्वास केला हाय, देवाचा पोरगा ख्रिस्त जो जगात येणार होता, तो तुचं हाय.”
लाजर ले जिवंत करणे
28हे म्हणून ते निघून गेली, अन् आपल्या बहिण मरियाले चुपचाप बलावून म्हतलं, “गुरुजी हाचं हाय, अन् तुले बलावून रायला हाय.” 29ते आयकून मरिया लवकर उठून त्याच्यापासी आली. 30(येशू आताही गावाच्या बायर होता, पण त्या जागी जती मार्थान त्याच्या सोबत भेट केली होती.) 31तवा ते यहुदी लोकं मरिया सोबत घरी होते, अन् तिला सांत्वना देऊन रायले होते, त्यायनं पायलं कि लवकर उठली अन् बायर जाऊन रायली होती; म्हणून ते हे विचार करून तिच्या मांग-मांग गेले, कि ती रडण्यासाठी कब्रेवर जाऊ रायली हाय. 32जवा मरिया तती पोचली जती येशू होता, तवा त्याले पायल्या बरोबर त्याच्या पायावर पडून म्हतलं, “हे प्रभू, जर तू अती असता तर माह्याला भाऊ नाई मेला असता.” 33जवा येशूनं तिले अन् यहुदी लोकायले जे तिच्या सोबत आले होते, रडताना पायलं, तवा सहानुभूती अन् दुखाने भरला, 34अन् विचारलं, “तुमी त्याले कुठसा ठेवलं हाय?” त्यायनं येशूले म्हतलं, “हे प्रभू, येऊन पावून घे” 35येशू रडला. 36तवा यहुदी लोकं म्हणाले लागले, “पाहा, तो त्याले किती प्रेम करत होता.” 37पण त्याच्यातून लय लोकायन म्हतलं, “काय हा ज्यानं फुटक्यायले बरे केले, तो लाजराले मरण्यापासून वाचू शकला असता.” 38येशू खूप दुखी होऊन, कबरे जवळ आला, ती एक गुफा होती, अन् एक गोटा गुफेच्या दरवाज्यावर लोटलेला होता. 39येशूनं म्हतलं, “गोट्याले ढकला.” मार्थान म्हतलं, “हे प्रभू, त्याच्यातून तर आता खराब वास येत असणार हाय, कावून कि त्याले मरून चार दिवस झाले हाय.” 40येशूनं मार्थाले म्हतलं, “काय मी तुले नाई म्हतलं होतं कि जर तू विश्वास करशीन, तर देवाच्या गौरवाले पायशीन.” 41तवा लोकायन त्या गोट्याले ढकलला, ज्या कबरेत मेलेलं शरीर ठेवलं होतं, मंग येशूनं वरते पाऊन म्हतलं, “हे बापा, मी तुह्या धन्यवाद करतो कि तू माह्यावालं आयकलं हाय. 42अन् मले मालूम हाय, कि तू नेहमी माह्याल आयकतो, पण जे गर्दी आजू बाजू उभी हाय, त्याच्या कारणाने मोठ्या आवाजाने मी हे म्हतलं, ज्याच्याच्यान त्यायनं विश्वास करावे, कि तू मले पाठवले हाय.” 43हे म्हणून येशूनं मोठ्या आवाजात म्हतलं, “हे लाजर, बायर ये!” 44तवा जो मेला होता, तो मुर्द्याच्या कपड्याच्या पट्ट्या सगट बांधलेला कब्रेतून बायर निघाला, अन् त्याचं तोंड दुसऱ्या कपड्याच्या पट्टीन झाकलेल होतं. येशूनं लोकायले म्हतलं, “त्याच्या कपड्याच्या पट्ट्या हटवून त्याले जाऊ द्या.”
येशूच्या विरुद्ध योजना
(मत्तय 26:1-5; मार्क 14:1-2; लूका 22:1-2)
45तवा जे यहुदी लोकं मरिया सोबत आले होते, अन् येशूचे हे काम पायलं होतं, त्यायच्यातून लय लोकायन त्याच्यावर विश्वास केला. 46पण त्यायच्यातून बऱ्याचं लोकायन परुशी लोकायले येशूच्या या कामाचा संदेश देला. 47यावर मुख्ययाजक व परुशी लोकायन न्यायसभेच्या लोकायले एकत्र करून विचारलं, “आमी काय करावे? हा माणूस तर लय चमत्कार दाखवते. 48जर आमी त्याले असचं सोडून देलं, तर सगळे त्याले ख्रिस्ताच्या रुपात त्याच्यावर विश्वास करतीन अन् रोमी लोकं येऊन आमच्या देवळाले अन् देशाले नष्ट करून टाकतीन.” 49तवा सभाच्या सदस्या मधला एक कैफा नावाच्या एका माणसानं जो त्या वर्षाचा महायाजक होता, त्यानं म्हतलं, “तुमाले काईच नाई माईत; 50अन् नाई हे समजता, कि तुमच्यासाठी हे चांगलं हाय, कि आमच्या लोकायसाठी एक माणूस मरावा, कि आपल्या सगळ्या जातीचे लोकं नष्ट नाई झाले पायजे.” 51हे गोष्ट त्यानं आपल्या स्वतापासून नाई म्हतली, पण त्या वर्षाचा महायाजक होऊन भविष्यवाणी केली, कि येशू इस्राएलच्या लोकायसाठी मरीन; 52पण फक्त त्यायच्या साठीच नाई. ते देवाच्या दुसऱ्या लेकरायसाठी पण मरणार जे या पृथ्वीवर पसरलेलं हायत, कावून कि त्यायले एकत्र करू शकले पायजे. 53मंग त्याचं दिवसापासून यहुदी पुढारी त्याले मारून टाक्याचा योजना बनू लागले. 54म्हणून येशू त्यावाक्ती पासून यहुदीया प्रांतात उघडपणे फिरला नाई; पण ततून सुनसान जागे जवळच्या इफ्राईम नावाच्या प्रांतातल्या एका गावात चालला गेला; अन् आपल्या शिष्याय संग ततीच राहू लागला. 55यहुदी लोकायचा फसह सणाचा वेळ जवळ होता, अन् लय लोकं आपल्या स्वताले शुद्ध कराले, फसह सणाच्या आगोदर देशाच्या दुसऱ्या भागातून यरुशलेम शहरात गेले. 56ते येशूले पाहू लागले, अन् देवळात उभे राहून आप-आपसात म्हणू लागले, “तुमाले काय वाटते? कि तो सणासाठी येईन किंवा नाई?” 57मुख्ययाजक अन् परुशी लोकायन पण आदेश देऊन ठेवला होता, जर कोणाले माईत झालं कि येशू कुठसा हाय तर सांगा कि त्याले बंदी करावे.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.