युहन्ना 10

10
मेंढपाळ अन् मेंढरायची कथा
1“मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी दरवाज्यातून मेंढरायच्या वाड्यात जात नाई, पण कोण्या दुसऱ्या रस्त्यान चढून जाते, तो चोर अन् डाकू हाय. 2पण मेंढरायले चारणारा दरवाज्याने जातो. 3त्याच्यासाठी द्वारपाल दरवाज्याले उघडून देते, अन् मेंढरं त्याचा आवाज ओयखतात, अन् तो आपल्या मेंढरायले नावानं हाका मारून बलावतो अन् बायर घेवून जाते. 4अन् जवा तो आपल्या सगळ्या मेंढरायले बायर काढून टाकते, तवा त्यायच्या समोर-समोर चालते, अन् मेंढरं त्याच्या मांग-मांग चालत जाते; कावून कि त्या त्याचा आवाज ओयखतात. 5पण त्या परक्या माणसाचा मांग नाई जातीन, पण त्याच्यापासून पळून जातीन, कावून कि त्या परक्या लोकायचा आवाज ओयखत नाई.” 6येशूनं त्यायले हे कथा सांगतली, पण त्यायले नाई समजली कि, त्याच्या बोलण्याचा काय अर्थ हाय.
येशू चांगला मेंढपाळ
7तवा येशूनं त्यायले परत म्हतलं, “तुमाले खरं-खरं सांगतो, कि मेंढरासाठी दरवाजा मी हावो. 8जेवढे लोकं आले; ते सगळे चोर अन् डाकू हायत, पण माह्ये मेंढरायन त्यायचं नाई आयकतं 9दरवाजा मी हाय; माह्यापासून अंदर येणाऱ्याचा देव तारण करीन, अन् अंदर बायर येणे जाणे करीन, अन् खायासाठी जेवण मिळवन. 10चोर फक्त मेंढारायले चोरण्यासाठी, मारून टाक्याले अन् नष्ट करून टाक्यालेच येते. मी यासाठी आलो कि ते खरचं जिवंत रायतीन. 11चांगला मेंढपाळ मी हाय; चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरायसाठी स्वताच्या इच्छेन जीव देते. 12जो मेंढरायले पाह्याले ठेवलेला नौकर जवा लांडग्याले येतांना पायते तवा तो पऊन जाईन, व मेंढरायले सोडून देईन कावून कि तो त्यायच्या मेंढपाळ नाई हाय, अन् मेंढ त्याचे नाई हायत, म्हणून लांडगा त्यायच्यावर हमला करते, अन् कळपाले फानाफान करून टाकतो. 13तो यासाठी पऊन जाते, कावून कि तो मजुर हाय, अन् त्याले मेंढरायची कायजी नाई. 14-15जसा बाप मले ओयखते, अन् मी बापाले ओयखतो, अश्याच प्रकारे, मी आपल्या मेंढरायले ओयखतो अन् माह्यी स्वताचे मेंढरू मले ओयखते. अन् मी मेंढरायसाठी मरायला तयार हाय. 16अन् माह्याले आणखी मेंढरं हायत, जे मेंढरायच्या वाड्यातल्या नाई; मले त्यायले पण आणणे आवश्यक हाय, ते माह्याला आवाज ओयखन; तवा एकच कळप अन् एकच मेंढपाळ राईन. 17बाप माह्यावर प्रेम करते, कावून कि स्वताच्या इच्छेने मरतो कावून कि मी परत जिवंत होऊन जावू. 18कोणी माह्या जीव माह्यापासून हिसकावून घेत नाई पण मी आपल्या स्वताच्या मर्जीन देतो. मले तो दियाचा अधिकार हाय, अन् त्याले परत वापस घीयाचा पण अधिकार हाय; कावून कि हे तेच आज्ञा हाय, जे मले माह्या बापापासून मिळाली हाय.” 19या गोष्टीच्यान यहुदी पुढाऱ्यात परत मतभेद झाला. 20त्यायच्यातून बरेचं जन म्हणू लागले, “त्याच्यात भुत आत्मा हाय, अन् तो पागल हाय; त्याची नका आयका.” 21दुसऱ्यायन म्हतलं, “ह्या गोष्टी अश्या माणसाच्या नाई ज्याच्यात भुत आत्मा हाय. कावून कि एक भुत आत्मा कधी पण एका फुटक्या माणसाले दुष्टी नाई देऊ शकत?”
यहुदी लोकायचा अविश्वास
22यरुशलेम शहरात स्थापन सण #10:22 स्थापन सण 167 ई.पु. मध्ये एंटियोकस एपिफेन्सच्या नेतृत्वात सिरीया देशाच्या लोकायन यरुशलेम शहरावर कब्जा केला, अन् यरुशलेमच्या देवळाले अपवित्र केलं, यहुदी लोकायन देवळाच्या समर्पणाच्या सणाच्या वेळी हा सण मनवला जो दरवर्षी डिसेम्बर महिन्यात झोपडीच्या सणाच्या दोन महिन्याच्या बाद येते अन् आठ दिवस चालते.झाला, अन् हिवाळ्याच्या ऋतू होता. 23अन् येशू देवळात सुलैमानाचा ओसारा जो देवळाच्या आंगणात होता, तती तो फिरत होता. 24तवा यहुदी पुढाऱ्यायन त्याले घेरलं, अन् विचारलं, “तू आमाले लय वेळा पासून संशयात मध्ये ठेवलं होतं, आता आमाले पष्ट पणे सांगून दे, काय तू ख्रिस्त हायस?” 25येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले सांगतलं, अन् तुमी विश्वास करतच नाई, जे काम मी आपल्या बापाच्या अधिकारानं करतो, तेच माह्यी साक्ष हाय. 26पण तुमी ह्या साठी विश्वास नाई करत, कावून कि तुमी माह्या मेंढरामधून नाई हा, जसं कि मी तुमाले म्हतलं होतं. 27माह्ये मेंढरू माह्या आवाज आयकतात, मी त्यायले ओयखतो अन् ते माह्या मांग-मांग चालतात. 28अन् मी तर त्यायले अनंत जीवन देतो, अन् ते कधीही नाश नाई होणार, अन् कोणी त्यायले माह्यापासून हिसकावून नाई घेऊ शकत. 29माह्या बाप ज्यानं त्यायले मले देलं हाय, तो सगळ्यात मोठा हाय, कोणी त्यायले बापाच्या हातून हिसकावून नाई घेऊ शकत. 30मी अन् बाप एकच हाय.” 31तवा यहुदी पुढाऱ्यायन त्याले माराले परत एक वेळा गोटे उचलले. 32याच्यावर येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले आपल्या देव बापाकडून लय सारे चांगले काम दाखवले, त्याच्यातून कोणत्या कामासाठी तुमी मले गोटे मारता?” 33तवा यहुदी पुढाऱ्यायन त्याले उत्तर देलं, “चांगल्या कामासाठी आमी तुले गोटे नाई मारत, पण देवाची निंदा केली म्हणून कावून कि तू माणूस असून स्वताले देव असाचा दावा करतो.” 34तवा येशूनं त्यायले उत्तर देलं, “काय नियमशास्त्रात असं नाई लिवलेल हाय, कि देवाने आपल्या लोकायच्या पुढाऱ्यायले म्हतलं, कि ते ईश्वर हाय? 35-36अन् तुमाले मालूम हाय, कि पवित्रशास्त्राले बदलू नाई शकत, म्हणून त्याच्या लोकायच्या पुढाऱ्यायले देव म्हतलं होतं.” जवा मी हे म्हणतो, “मी देवाचा पोरगा हावो,” तवा तुमी मले कावून म्हणता, “तू देवाचा निंदा करतो. मी तोच हाय ज्याले देवबापाने वेगळे केले, अन् मले जगात पाठविले. 37मी जर आपल्या देवबापाचे कृत्य करत नसल्यास माह्यावर विश्वास ठेऊ नका. 38पण जर मी आपल्या देवबापाचे काम करतो, तर माह्या विश्वास करान पण नाई, पण माह्या कामावर विश्वास करा, तवा तुमाले माईत होईन कि बाप माह्यात अन् मी बापात हाय.” 39तवा त्यायनं परत येशूले पकडण्यासाठी प्रयत्न केला, पण तो त्यायच्या पासून दूर चालला गेला. 40येशू यरदन नदीच्या पूर्वदिशेने त्या जाग्यावर गेला, जती योहान बाप्तिस्मा देणारा पयले बाप्तिस्मा देत होता, अन् येशू ततीच रायला. 41लय सारे लोकं त्याच्यापासी येऊन म्हणत होते, “योहान बाप्तिस्मा देणाऱ्याने तर काई चमत्कार नाई दाखवलं, पण जे काई योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या बाऱ्यात म्हतलं होतं, ते सगळं खरं होतं.” 42अन् तती लय साऱ्या लोकायन येशूवर विश्वास केला.

高亮显示

分享

复制

None

想要在所有设备上保存你的高亮显示吗? 注册或登录