लुका 13

13
पश्चाताप करा नाई तर नाश व्हा
1अन् त्याचं वाक्ती काई लोकं आले, अन् येशूच्या संग त्या गालील प्रांताच्या लोकायच्या बद्दल चर्चा करून रायले होते, कि पिलातुस रोम देशाच्या राज्यपालान गालील प्रांताच्या काई लोकायची हत्या करून टाकली होती, जवा ते यरुशलेमच्या देवळात बलिदान करत होते. 2हे आयकून येशूनं त्यायले उत्तर देऊन म्हतलं, “काय तुमाले असं वाटते, कि हे लोकं गालील प्रांताच्या दुसऱ्या लोकाय पेक्षा जास्त पापी होते, म्हणून त्यायच्यावर असे दुख आले?” 3हे असं बिलकुल नाई, मी तुमाले सांगतो, “जर तुमी पापापासून पश्चाताप करसान नाई, तर तुमी सगळे त्यायच्या सारखे नाश हून जासान. 4काय तुमाले वाटते जे अठरा जन ज्यायच्यावर यरुशलेम शहराजवळचा शिलोहातला मिनार पडली, अन् ते दबून मेले, काय ते यरुशलेम शहरातल्या सगळ्या रायणाऱ्यायवून अधिक पापी होते? 5हे असं बिलकुल नाई, मी तुमाले सांगतो, पण तुमी पापापासून पश्चाताप करसान नाई, तर तुमी पण सर्व त्यायच्या सारखे नाश हून जासान.”
फळ नसलेला अंजीराचा झाड
6मंग येशूनं ही कथा सांगतली, “कोण्या एकाझणाच्या अंगुराच्या वाडीत एक अंजीराचे झाड लावलेले होतं, दरवर्षी तो त्या झाडाले फळ पाह्याले आला पण दिसलं नाई. 7तवा त्यानं वाडीच्या रखवाल्याले म्हतलं, पाह्य मी तीन वर्षापासून ह्या अंजीराच्या झाडाले फळ पाह्याले येऊन रायलो, पण मले काईच दिसलं नाई, म्हणून ते झाड तोडून टाक कावून कि हा चांगल्या जमिनीले खराब करत हाय. 8तवा त्यानं त्याले उत्तर देलं, हे स्वामी त्याले एक आणखी वर्ष राऊ दे, मी याची सोय घेतो, अन् खत पाणी टाकतो. 9अन् जर आता ह्या झाडानं फळ#13:9 झाडानं फळ अंजीराचे झाड इस्राएलच्या लोकायले दाखवते देले नाई, तर ते तोडून टाकीन.”
कुबड्या बाईले बरं करणे
10एका आरामाच्या दिवशी येशू धार्मिक सभास्थानात शिकवण देऊ रायला होता. 11अन् पाहा, तती एक बाई जिले अठरा वर्षापासून एक शारीरिक कमजोरीचा भुत आत्मा लागला होता, अन् ते कुबडी झाली होती, अन् कोणत्याचं रीतीने सरखी होतं नव्हती. 12येशूनं तिले पाऊन जवळ बलावलं, अन् म्हतलं, “हे बाई तू आपल्या या शारीरिक कमजोरी पासून मुक्त केलेली हायस.” 13तवा येशूनं तिच्यावर हात ठेवला, अन् ते लगेचं सरखी झाली, अन् देवाचा गौरव करू लागली. 14पण येशूनं आरामाच्या दिवशी बरं केलं, म्हणून धार्मिक सभास्थानाचा अधिकाऱ्यान क्रोधात येऊन लोकायले म्हतलं, “सहा दिवस हायत त्या दिवसात आमाले काम करायची अनुमती हाय म्हणून त्याचं दिवसात बरं हून जात जा, पण शब्बाथाचा दिवशी नाई.” 15हे आयकून प्रभू येशूनं उत्तर देऊन म्हतलं, “अरे कपटी, काय तुमच्याईत कईक जन आपल्या बैलाले किंवा गद्याले आरामाच्या दिवशी ठाणावरून सोडून पाणी पियाले नेत नाई? 16अन् काय हे योग्य नाई होतं, कि हे बाई अब्राहामाची खानदानातली हाय, जिले सैतानान अठरा वर्ष बांधून ठेवलं होतं, आरामाच्या दिवशी त्या बंधनातून सोडल्या गेली.” 17जवा त्यानं ह्या गोष्टी सांगतल्या, तवा त्याचे सगळे विरोधी लाजले, अन् सऱ्या लोकायन त्याचा गौरवाच्या कामाचा जे त्यानं केलं होतं, आनंदित झाले.
मोवरीचा दाना अन् खमीरची कथा
(मत्तय 13:31-33; मार्क 4:30-32)
18-19परत येशूनं म्हतलं, “देवाच राज्य कायच्या सारखं हाय? अन् मी त्याची तुलना कोण्या संग करू? ते मवरीच्या दाण्यासारखं हाय, जवा तो वावरात पेरतात, तवा तो सगळ्या बिया पेक्षा लहान व बारीक असते ज्यावाक्ती ते बिया जमिनीत पेरल्या जाते तवा ते उगवते, अन् ते मोठे झाड झाले अन् त्याले एवढ्या फांद्या फुटतात की अभायातले पाखरं, येऊन त्याच्या सावलीत रायतात व घर बनवतात.” 20-21तवा येशूनं आणखी म्हतलं, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणा सोबत करू, ते खमीरा सारखे हाय, ज्याले कोण्या बाईने घेऊन तीन पायल्या (सहा किलो) पीटात मिळवलं, अन् हळू-हळू ते सगळे पिट खमीर झाले.”
अरुंद दरवाजा
22अन् येशू आपल्या शिष्याय सोबत नगरा-नगरात अन् गावा-गावात शिकवण देत यरुशलेम शहराकडे जाऊन रायला होता. 23अन् कोणतरी एका जनानं येशूले विचारलं, “हे गुरुजी, काय देव मोचक्या लोकायलेच अनंत काळाच्या दंडापासून वाचविन?” 24तवा येशूनं त्याले म्हतलं, “अरुंद दरवाज्यान प्रवेश करूनच देवाच्या राज्यात जाऊ शकता कावून कि मी तुमाले सांगतो, बरेचं जन जाण्याचा प्रयत्न करतीन पण जाऊ शकणार नाई. 25जवा देवानं जो घराचा मालक हाय, उठून दरवाजा बंद करून टाकणं, अन् तुमी बायर उभे राऊन दरवाज्या वाजवून विनंती करान, हे प्रभू आमच्यासाठी दरवाजा उघडं, तवा तो तुमाले उत्तर देऊन, मी तुमाले ओयखत नाई तुमी कुठचे हा? 26तवा तुमी म्हणसान, कि आमी तुह्यावाल्या समोर जेवलो-खावलो, अन् तू आमच्या गावाच्या चौकात शिक्षण देले. 27पण तो म्हणीन, मी तुमाले म्हणतो, तुमी कुठचे हा, हे बेकार काम करणाऱ्यानो तुमी माह्यापासून दूर जा. 28ततीसा रडणं अन् दात खानं होईन, अन् त्यायले लय तरास होईन तवा तुमी अब्राहामाले अन् इसहाकाले व याकोबाले अन् सर्व्या भविष्यवक्त्याले देवाच्या राज्यात बसलेले अन् आपल्या स्व:ताले बायर काढलेलं पायसान. 29तवा ते पूर्व अन् पश्चिम दिशेतून लय सारे अन्यजातीचे लोकं येवून देवाच्या राज्याच्या पंगतीत सहभागी होतीन. 30अन् आयका, त्यावाक्ती ज्यायचं काईच महत्व नाई त्यायले जास्त महत्व देल्या जाईन, अन् जे जास्त महत्वपूर्ण हायत, त्यायचं काईच महत्व रायणार नाई.”
हेरोद राजाची शत्रूता
(मत्तय 23:37-39)
31त्याचं दिवशी परुशी लोकायन येऊन येशूले म्हतलं, “तू अतून निघून जाय, कावून कि हेरोद राजा तुले जीवानं मारून टाक्यासाठी पाऊ रायला हाय.” 32तवा येशूनं त्यायले म्हतलं, “जाऊन त्या कोल्ह्या सारख्या चालाक माणसाले सांगा, कि पाहा मी आज अन् उद्या भुतायले काढतो, अन् बिमार लोकायले चांगलं करतो, अन् तिसऱ्या दिवशी आपलं काम पूर्ण करीन. 33तरी पण मले आज अन् उद्या अन् परवा यात्रा करासाठी चल्याले पायजे, कावून कि यरुशलेम शहराले सोडून कुठे पण कोण्या भविष्यवक्ताले मारून टाकणे चांगले नाई.”
यरुशलेम शहरासाठी दुख
34“हे यरुशलेम शहराच्या लोकायनो, तुमी ज्या भविष्यवक्त्यायले मारून टाकलं हाय, ज्यायले तुह्याच्या पासी लय पयले पाठवले होते, त्यायले गोटमार करता, किती तरी वेळ मले वाटलं कि जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाच्या खाली रक्षा करते, तसचं मी पण तुमच्या लेकरायची रक्षा करीन, पण तुमची इच्छा नव्हती. 35अन् मी निश्चित पणे तुमाले सांगतो, तुमचं घर तुमच्यासाठी ओसाड सोडले हाय, कावून कि, मी तुमाले सांगतो, कि आतापासून जोपर्यंत तुमी नाई म्हणसान, धन्य हाय तो, जो प्रभूच्या अधिकारानं येतो, तवा पर्यंत तुमी मले परत कधी नाई पायसान.”

Àwon tá yàn lọ́wọ́lọ́wọ́ báyìí:

लुका 13: VAHNT

Ìsàmì-sí

Pín

Daako

None

Ṣé o fẹ́ fi àwọn ohun pàtàkì pamọ́ sórí gbogbo àwọn ẹ̀rọ rẹ? Wọlé pẹ̀lú àkántì tuntun tàbí wọlé pẹ̀lú àkántì tí tẹ́lẹ̀

Àwọn fídíò fún लुका 13