मत्तय 6

6
दान
1सावधान राहा. तुमी माणसस्ले दाखाडा साठे चांगला काम नका करा, नईत तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास तुमले काही बी फय नई देवाव. 2एनासाठे जव तू दान करस, दुसरा लोकस्ना ध्यान आकर्षित नका करा, जसा कपटी प्रार्थना घरस्मा व गल्ल्यास मा करतस, एनासाठे कि लोक तेस्ना बडाई करोत मी तुमले खर सांगस, जेना कण तेस्ले लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे, पण परमेश्वर तेस्ले कोणताच प्रतीफय नई देवाव. 3पण जव तू दान करस, त जो तुना उजवा हात करस, तेले दुसरा लोकस्ले माहित नई पाळाले पायजे. 4एनासाठे कि तुना दान गुप्त राहो, आणि तव तुना बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
प्रार्थना
(लूक 11:2-4)
5जव तू प्रार्थना करस तो कपटी सारखा नको होवू, कारण कि लोक तेस्ले देखोत आणि तेस्नी बडाई करोत, प्रार्थना घरस्मा आणि रस्तास्ना चौक वर उभा ऱ्हायसन प्रार्थना कराले तेस्ले चांगल वाटस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे. जी लोकस्ना द्वारा बडाई भेटी जायेल शे. 6पण जव तू प्रार्थना करशी, त आपली खोली मा जाय, आणि दरवाजा बंद करीसन, आपला स्वर्ग मधला बाप संगे जेले कोणी नई देखू सकत, तेना संगे प्रार्थना कर, आणि तव तुना स्वर्ग मधला बाप जो गुप्त मा देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन. 7प्रार्थना करतांना अन्यजाती सारखा शब्द परत सांगाणा द्वारे बळबळ नका करा. कारण कि त्या समजतस तेस्ना शब्दस्ले परत सांगाणा द्वारे आणि बळबळ करावर तेस्नी आयकामा ईन. 8एनासाठे तुमी तेस्ना सारखा नका बना, कारण कि तुमना स्वर्ग मधला बाप ले तुमना मांगाना पयलेच माहित शे, कि तुमले कसा कसा नि गरज शे.
प्रभु नि शिकाळेल प्रार्थना
9तुमले ह्या प्रमाणे प्रार्थना कराले पाहिजे, ए आमना बाप, तुजो स्वर्ग मा शे, तुना पवित्र नाव ना आदर करामा येवो. 10तुना राज्य येवो, तुनी ईच्छा जशी स्वर्ग मा पुरी होस, तशी पुर्थ्वी वर बी होवो. 11आम्हनी दिन भर नि भाकर आज आमले दे. 12आणि जसा आमी आपला अपराधीस्ले माफ करेल शेत, तसाच तू बी आमना अपराधस्ले माफ कर. 13आणि आमले परीक्षा मा नको लयजो, पण सैतान पासून आमले वाचाळ. कारण कि राज्य सामर्थ आणि गौरव कायम तुनीच शे, आमेन. 14एनासाठे कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ करशात, त परमेश्वर तुमना बाप जो स्वर्ग मा ऱ्हास, तुमले माफ करीन. 15कदी तुमी माणसस्ना अपराधस्ले माफ नई कराव, त तुमना स्वर्ग मधला बाप बी तुमले माफ नई कराव.
उपवास
16जव तुमी उपवास करशात, तव कपटी सारखा तुमना तोंड वर उदासी नका दिखाले पाहिजे, कारण कि त्या आपला तोंड दुखी दाखाळतस, एनासाठे कि लोकस्ले समजो कि त्या उपवाशी शेतस. मी तुमले खर सांगस, कि तेस्ले आपला प्रतीफय भेटी जायेल शे, जे कि लोकस्ना द्वारा बडाई शे. 17पण जव तू उपवास करशी त आपला डोका वर तेल लाव आणि तोंड धोय. 18एनासाठे कि लोक नई पण तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले गुप्त मा देखस, तुले उपवाशी समजो. याच दशा मा तुमना स्वर्ग मधला बाप जो तुले देखस, तुले सर्वा समोर प्रतीफय दिन.
स्वर्ग मधला धन
(लूक 12:33,34)
19आपला साठे पृथ्वी वर धन एकत्र नका करा, जठे उदी आणि जंग खराब करस आणि चोर मधमा घुशिसन चोरी लीजातस. 20पण चांगल करीसन स्वर्ग मा आपला साठे प्रतीफय एकत्र करा, जठे उदी आणि जंग नाश नई करस, आणि जठे चोर नईत मधमा घुशिसन चोरी करतस. 21कारण कि तुना मन कायम तठेच लागेल राहीन जठे तुना धन शे.
शरीर ना दिवा
(लूक 11:34-36)
22डोया शरीर साठे एक दिवा ना सारखा शेतस, एनासाठे कदी तुना डोया चांगला शेतस, तव तुना सर्वा शरीर उजळ हुईन. 23एनासाठे कदी तू विचार करस कि, तुना मन प्रकाशमान शे, पण खरज प्रकाशमान नई अंधार शे, तव तुना मधमा जो अंधार शे, तो गैरा जास्त अंधार वाला हुईन.
परमेश्वर आणि धन
(लूक 16:13; 12:22-31)
24कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. तुमी परमेश्वर आणि धन या दोनीस्नी सेवा नई करू सकतस. 25एनासाठे मी तुमले सांगस, कि दररोज ना शारीरिक जीवन साठे हय चिंता नका करज्यात, कि आमी काय खासुत आणि काय पीसुत, आणि नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत, निश्चित रूप मा तुमना जीवन तुमना खावा पिवा तून जास्त किमती शे. आणि तुमना शरीर तुमना द्वारे घालायनारा कपळास्नि तुलना मा जास्त किमती शे. 26आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी तुमना स्वर्गीय बाप तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत शेतस. 27तुमना मधून असा कोण शे, जो चिंता करीसन थोळा जास्त टाईम लगून जित्ता राहू सकस?
28आणि कपळा साठे काबर चिंता करतस? जंगल मधला फुलस्वर ध्यान द्या, कि त्या कसा वाढतस, त्या नईत कष्ट करतस, नईत कपळा बनावतस. 29पण मी तुमले सांगस, कि राजा शलमोन बी, आपला सर्वा वैभव मा त्या फुलस मधून कोणा सारखा कपळा घालेल नई होता. 30एनासाठे जव परमेश्वर मैदान ना गवत ले, जो आज शे, आणि कालदिन आग मा फेकामा ईन, अशी सुंदरता देस, त तो निश्चित रूप मा तुमनी बी देखभाल करीन, तुमना विश्वास इतला कमजोर काब शे?
31एनासाठे तुमी चिंता करीसन हय नका सांगज्यात, कि आमी काय खासुत, कि काय पीसुत, आणि काय घालसुत? 32कारण कि दुसऱ्या जाती ह्या सगळ्या गोष्टीस्ना शोध मा ऱ्हास, आणि तुमना स्वर्गीय बाप ले माहित शे, कि तुमले या सर्वा वस्तू पाहिजे, एनासाठे चिंता नका करा. 33एनासाठे सर्वास्तून पहिले हय करा, कि परमेश्वर ना राज्य आणि तेना धार्मिकता ना शोध करा, त या सर्वा वस्तू तुमले भेटी जातीन. 34एनासाठे कालदिन ना बारामा चिंता नका करा, कारण कि कालदिन आपलीच चिंतास्ले लईन. आज ना साठे आज ना दु:ख गैरा शे.

Поточний вибір:

मत्तय 6: AHRNT

Позначайте

Поділитись

Копіювати

None

Хочете, щоб ваші позначення зберігалися на всіх ваших пристроях? Зареєструйтеся або увійдіть

YouVersion використовує файли cookie для персоналізації вашого досвіду. Використовуючи наш вебсайт, ви приймаєте використання файлів cookie, як описано в нашій Політиці конфіденційності