1
मत्तय 1:21
मराठी समकालीन आवृत्ती
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्यांचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
Сравнить
Изучить मत्तय 1:21
2
मत्तय 1:23
“कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल, आणि त्यांचे नाव इम्मानुएल ठेवतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
Изучить मत्तय 1:23
3
मत्तय 1:20
परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभुचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “योसेफा दावीदाच्या पुत्रा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण जे तिच्या गर्भामध्ये आहे ते पवित्र आत्म्याकडून आहे.
Изучить मत्तय 1:20
4
मत्तय 1:18-19
येशू ख्रिस्त यांचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीया, हिचे लग्न योसेफाबरोबर ठरलेले होते. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले. तिचा पती योसेफ हा नीतिमान होता, आणि समाजात तिला लज्जित करू नये म्हणून त्याने तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे मनात ठरविले.
Изучить मत्तय 1:18-19
Главная
Библия
Планы
Видео