1
लूक 23:34
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
Сравнить
Изучить लूक 23:34
2
लूक 23:43
येशूंनी त्याला उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
Изучить लूक 23:43
3
लूक 23:42
मग तो येशूंना म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा.”
Изучить लूक 23:42
4
लूक 23:46
तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Изучить लूक 23:46
5
लूक 23:33
जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता.
Изучить लूक 23:33
6
लूक 23:44-45
आता दुपारची वेळ झाली होती, आणि संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. सूर्यप्रकाश देण्याचे थांबला. मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला.
Изучить लूक 23:44-45
7
लूक 23:47
काय घडले हे पाहून रोमी शताधिपतीने परमेश्वराचे गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
Изучить लूक 23:47
Главная
Библия
Планы
Видео