ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकाSample
लूक आपल्याला सांगतात की येशूंनी जाहीर केले की देवाचे राज्य हे प्रत्येक शहर आणि गावांवर आहे. पण एखाद्या सम्राट राजाच्या विशिष्ट लोकांसोबत प्रवास करण्याच्या पद्धती शिवाय, येशूंनी आपल्या काही निवडक बारा व्यक्तींबरोबर आणि काही महिलांसोबत ज्यांचे दुःख निवारण येशूंनी केले होते त्यांच्यासोबत प्रवास केला. आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासोबत फक्त कामापुरते येत नव्हते तर, ते त्यांच्यासोबत एकरुपतेने सहभागी होत होते. ज्या लोकांनी येशूंकडून चांगली बातमी ऐकली किंवा स्वातंत्र्य अनुभवले आणि त्यांचे दुःख निवारण झाले, अशी लोकं येशूंची महती पुढील शहराला सांगत होते.
त्यांचा संपूर्ण प्रवास हा जंगलातून होत होता. येशूंनी खवळलेल्या समुद्राला शांत केले, हजारो पापांपासून माणसाला मुक्त केले, ज्या महिलेला बारा वर्षांपासून शारीरिक त्रास होता तिचा त्रास दूर केला, एका बारा वर्षाच्या मुलीला मृत्यूनंतर सजीव केले, आणि एका व्यक्तीच्या जेवणामध्ये हजारो लोकांना जेऊ घातले–– सगळ्यांनी जेवण केल्यानंतर, बारा लोकांना पुरेल इतके अन्न शिल्लक राहिले.
आता आपण समास वाचला, आणि आपल्याला लक्षात आले असेल की लूक यांनी “ बारा” हा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. लक्षात घ्या येशूंनी जाणीवपूर्वक बारा अनुयायांना निवडले जे इस्त्राईलच्या बारा जमातींच्या सहभागाचे प्रतीक होते. लूक ज्यांना हे सत्य सगळ्यांना दर्शवायचे होते, त्यामुळे त्यांनी गोस्पेलमध्ये “ बारा” हा शब्द अनेक वेळा वापरलेला आहे. प्रत्येक वेळी त्यांनी हा शब्द वापरला, त्यांनी इतर मार्गाने असे दाखवले की, येशूंनी इस्त्राईल मधील बारा जमातीकडे लक्ष दिले आणि त्यानंतर संपूर्ण जगावर त्यांचे लक्ष आहे.
देवाने वचन दिले की या इस्त्राईलच्या जमातीमुळे सर्व जगाला आशीर्वाद लाभेल, आणि सर्व जगाला दिशा दाखवणारा इस्त्राईल हा देश ठरेल. इस्त्राईल कडून त्याच्या योगदानाबद्दल चूक झाली, पण आपले वचन पाळण्यासाठी देव हा अत्यंत विश्वासू आहे. येशू इस्त्राईलचा माध्यमातून सर्व जगाला आशीर्वादित करण्यासाठी आले आहेत आणि त्यांनी देवाचे साम्राज्य जाहीर करण्यासाठी बारा अनुयायी इतरत्र पाठवले आहेत.
About this Plan
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More