Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लुका 21

21
कंगाल विधवेचा खरा दान
(मार्क 12:41-44)
1मंग येशूनं धनवान लोकायले आप-आपले दान दानपेटीत टाकतांना पायलं. 2अन् त्यानं एका गरीब विधवेला पण दानपेटीत दोन लहानसे चांदीचे सिक्के टाकतांना पायलं. 3तवा येशूनं म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि या गरीब विधवेनं सगळ्या पेक्षा अधिक टाकलं हाय. 4कावून कि त्या सगळ्याईन आपल्या-आपल्या संपत्तीच्या भरपूरीतून दानपेटीत दान टाकलं हाय, पण या विधवेनं आपल्या कमाईतून जे काई तिच्याजवळ होतं, म्हणजे तिनं आपली सर्व उपजीविका टाकली.”
जगाच्या समाप्तीचे लक्षण
(मत्तय 24:1-14; मार्क 13:1-13)
5जवा किती तरी लोकं देवळाच्या बद्दल म्हणत होते, कि गुरुजी पाहा कसे-कसे मोठ्या गोट्यायची सुंदर इमारती हायत. 6येशूनं म्हतलं, “या मोठ्या इमारती ज्यायले तुमी पायत हा, पण मी तुमाले खरं-खरं सांगतो कि असे दिवस येतीन जवा वैरी ह्या सर्व्या देवळाले नष्ट करीन अन् इथं एक पण दगड दिसन नाई.”
7शिष्यायनं येशूले विचारलं, “हे गुरुजी, आमाले सांग कि हे सगळं कधी होईन? अन् ह्या गोष्टी जवा पुऱ्या होतीन, त्या वाक्तीच चिन्ह काय-काय होईन.” 8तवा येशूनं म्हतलं, “तुमी फसू नये म्हणून सावध राहा, कावून कि बरेचं जन माह्या नावाने येऊन म्हणतीन, कि मी तोचं हावो, अन् असं पण कि वेळ जवळ आला हाय: म्हणून तुमी त्यायच्या मागे नको जासान. 9अन् जवा तुमी लढाया अन् विद्रोहाच्या विषयी आयकसान, तवा तुमी भेऊ नका, कावून कि हे होणे पक्के हाय, पण हा जगाचा अंत नाई हाय.”
10-11मंग त्यानं त्यायले म्हतलं, “तवा एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण मोठे-मोठे भूपंक होईन, अन् जागो-जागी अकाल अन् महामाऱ्या पडतीन, अन् अभायातून भयंकर उत्पात व मोठं-मोठे चिन्ह प्रगट होतीन. 12-13पण ह्या सगळ्या गोष्टीच्या आगोदर, ते लोकं तुमी माह्यावर विश्वास केला म्हणून तुमाले पकडतीन, अन् सतावतीन, अन् धार्मिक सभास्थानात तुमाले दंड देतीन, अन् जेलात टाकतीन, अन् राजायपासी अन् अधिकाऱ्याच्या हाती सोपून देतीन, पण हे तुमच्यासाठी साक्ष द्याचा मौका अशीन. 14म्हणून आपल्या-आपल्या मनात हा निर्धार ठेवा, कि उत्तर कसं घ्यावं याची काळजी नाई करणार. 15कावून कि मी तुमाले असं बोलणं अन् बुद्धी देईन, कि तुमचे सगळे विरोधी तुमचा सामना किंवा खंडन करू नाई शकतीन. 16अन् तुमचे माय-बाप अन् भाऊ अन् परिवार, अन् मित्र पण तुमाले पकडून देतीन, अतपर्यंत कि तुमच्या पैकी कईकायले मारून टाकतीन. 17अन् माह्या नावाच्या मुळे सगळे लोकं तुमचा व्देष करतीन. 18पण तुमची काईच हानी होणार नाई. 19तुमी आपल्या धैर्याने आपला जीव वाचवाल.”
यरुशलेमचा नाश
(मत्तय 24:15-21; मार्क 13:14-19)
20“जवा तुमी यरुशलेम शहर सैन्यानं घेरलेलं पायसान, तवा ओयखून जासान कि त्याचं नाश होणं जवळ हाय. 21तवा जे यहुदीया प्रांतात हायत त्यायनं पहाडावर पवून जावे, अन् जे यरुशलेम शहराच्या अंदर असतीन त्यायनं बायर निघून जावं, अन् जे आसपासच्या गावात असतीन त्यायनं तती जाऊ नये. 22कावून कि हा तो वेळ राईन जवा देव इथल्या सगळ्या लोकायले दंड देईन. ज्याच्यात पवित्रशास्त्रात लिवलेल्या सर्व्या गोष्टी पुऱ्या हून जातीन. 23या दिवसात जे गर्भवती, अन् दुध पाजणाऱ्या बाया असतीन त्यांची अवस्था लय भयंकर होईन कावून कि त्यायच्यासाठी पयन लय कठीण राईन; कावून कि देशात मोठे संकट अन् या लोकायवर मोठी आपत्ती होईन. 24तवा ते तलवारीन मारले जातीन, अन् काई लोकायले दुसऱ्या देशात बंदी बनवून पोहचवले जातीन, तोपरेंत यरुशलेम शहर अन्यजाती लोकायच्या हातून त्या वेळेपरेंत तुडवल्या जाईन जोपरेंत अन्यजातीच्या लोकायची वेळ पूर्ण नाई होईन.”
येशूचा वापस येण्याचा चिन्ह
(मत्तय 24:29-31; मार्क 13:24-27)
25“अन् सुर्य व चंद्र व तारे याच्यात चिन्ह प्रगट होतीन, अन् जमिनीवर अन्यजातीच्या लोकायवर संकट येईन, कावून कि ते समुद्राच्या गर्जनेने अन् लाटायच्या कोलाहटीने घाबरून जातीन. 26अन् भीतीच्या कारणाने अन् पृथ्वीवर येणाऱ्या गोष्टीची वाट पायतं-पायतं, लोकायच्या जीवांत जीव रायणार नाई, कावून कि अभायातल्या ताकती हालवल्या जाईन. 27तवा ते मी, माणसाच्या पोराले सामर्थ्यानं अन् मोठ्या गौरवानं अभायाच्या ढगावर येतांना पायतीन, 28जवा ह्या गोष्टी होतीन, तवा सरळ हून आपले मुंण्डक वर करा, कावून कि तुमचं मुक्ती जवळ असेल.”
देवाच राज्य जवळ हाय
(मत्तय 24:32-35; मार्क 13:28-31)
29तवा त्यानं त्यायले एक कथा पण सांगतली, ते हि कि “अंजीराच्या झाडाले पाहा अन् सगळ्या झाडायले पाहा, 30जवा त्यायले पालवी फुटू लागते तवा ते पाऊन तुमाले मालूम होते कि ऊनाया जवळ आला असं तुमी समजता. 31या सारखच जवा तुमी ह्या गोष्टीले होतान पायसान तर जानसाल कि देवाचं राज्य जवळ आलं हाय. 32मी तुमाले खरं-खरं सांगतो की जतपरेंत हे पूर होणार नाई, ततपरेंत ह्या पीडीचे कोणीचं लोकं मरतीन नाई. 33अभायाचा व पृथ्वीचा नाश होईन, पण माह्य वचन कधीच पूर्ण झाल्या शिवाय रायणार नाई.”
नेहमी तयार रहो
34“म्हणून सावधान राहा, असं नाई व्हावं कि तुमचे मन खुमार अन् दारूबाजी, अन् संसाराच्या चिंतेने सुस्त हून जाईन, अन् तो दिवस तुमच्यावर फासासारखा अचानक येऊन जाईन. 35कावून कि सर्व्या पृथ्वीच्या सगळ्या रायनाऱ्या लोकायवर तसाचं येईन. 36म्हणून जागी रायजाक अन् हरवेळी प्रार्थना करत राहा, कि तुमी या सर्व्या येणाऱ्या घटनापासून वाचण्या करिता अन् माणसाच्या पोराच्या समोर उभं रायन्या योग्य असावे.”
37अन् तो दिवसाले देवळात उपदेश करत होता, अन् रात्रीच्या वाक्ती बायर जाऊन जैतून नावाच्या पहाडावर रायत होता. 38अन् मोठ्या सकाळीच सगळे लोकं त्याचं आयक्यासाठी देवळात त्याच्यापासी येत असतं

Atualmente Selecionado:

लुका 21: VAHNT

Destaque

Compartilhar

Copiar

None

Quer salvar seus destaques em todos os seus dispositivos? Cadastre-se ou faça o login