Logotipo da YouVersion
Ícone de Pesquisa

लुका 17

17
चेतावणी
(मत्तय 18:6-7,21-22; मार्क 9:42)
1मंग येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “हे निश्चित हाय त्या गोष्टी ज्या पापाचं कारण हाय, पण त्या माणसावर हाय ज्या माणसापासून ते येतात. 2जर कोणी या लायण्यातुन लायना जो माह्यावर विश्वास करतो, त्याच्या विश्वासाचा ठोकर खायचे कारण बनते, तर त्याच्यासाठी हे चांगलं असतं, कि त्याच्या गयात जात्याचा पाट लटकून समुन्द्रात टाकून द्या.” 3“सावध राहा कि तुमी काय करता, जर तुह्यावाल्या भावानं अपराध केला अशीन, तर त्याले दाट, अन् जर तो पश्चाताप करत अशीन तर त्याले क्षमा कर. 4जर त्यानं दिवस भऱ्यातून सात वेळा, तुह्या अपराध केला अशीन, अन् सातही वेळा तुह्यावाल्या पासी येऊन म्हणीन कि मले पश्चात्ताप आला हाय, तवा त्याले क्षमा कर.”
तुमचा विश्वास किती मोठा हाय?
5मंग प्रेषितान प्रभू येशूले म्हतलं, “आमच्या विश्वासाले आणखी मजबूत कर.” 6तवा प्रभू येशूनं म्हतलं, “जर तुमाले राईच्या दाण्या एवढा पण विश्वास असता, तर तुमी ह्या झाडाले म्हतलं असते कि बुडापासून उपटून समुद्रात लागून जा, तर त्यानं तुमची आज्ञा मानली असती.”
उत्तम सेवक
7“तुमच्याईत असा कोण हाय, कि जवा त्याचा नौकर नांगर जुतून किंवा मेंढरं चारून घरी येते, अन् जवा तो वावरातून आल्यावर पटकन त्या नौकाराले म्हणते, लवकर येऊन जेव्याले बस? 8असं नाई, पण तू मालक आपल्या नौकाराले म्हणसीन, कि माह्यासाठी जेवण तयार कर, अन् जोपर्यंत मी जेवण खतम नाई करत, तोपर्यंत माह्याली सेवा करासाठी तयार होऊन जाय, मंग याच्या बाद तू जेवण करजो. 9ज्या गोष्टी करण्याबद्दल तुमी नौकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुमी त्यास धन्यवाद म्हणता का? 10अशाचं प्रकारे तुमीहि, जवा त्या कामांना करसान ज्याची आज्ञा तुमाले देली गेली होती, तवा तुमाले हे म्हणाले पायजे कि आमी साधारण दास हावो कावून कि जे आमाले कराच होतं तेवढच आमी केलं.”
एक कुष्ठरोगी चा आभार
11येशू अन् त्याचे शिष्य जवा यरुशलेम शहराकडे चालत जाऊन रायले होते, अन् असं झालं कि, त्यावाक्ती ते सामरीया प्रांताच्या अन् गालील प्रांताच्या मधातून गेले. 12अन् कोण्या एका गावात प्रवेश करत असतांना, त्याले दहा कुष्ठरोगी माणसं भेटले, 13अन् तवा त्यायनं दूरचं उभे राऊन, मोठ्या आवाजाने म्हतलं, “हे येशू, हे स्वामी, आमच्यावर दया कर!” 14येशूनं त्यायले पाऊन म्हतलं, “तुमी जाऊन आपल्या याजकाले दाखवा,” अन् जवा ते जाऊन रायले होते तवा जाताजाताचं बरे होऊन गेले. 15तवा त्यायच्यातून एकानं पायलं कि मी बरा झालो हाय, तो मोठ्या आवाजाने देवाची स्तुती करत येशू पासी वापस आला; 16अन् येशूच्या पायाजवळ उभडा पडून, त्याच्या धन्यवाद करू लागला, तो सामरी प्रांताचा माणूस होता. 17ह्यावर येशूनं विचारलं, “काय दहाही कुष्ठरोगी माणसं बरे नाई झाले, तर ते नऊ जन कुठसाकं हायत? 18काय ह्या परदेशातल्या माणसाले सोडून आणखी कोणी नाई निगाला, जो देवाची स्तुती करीन?” 19तवा येशूनं त्याले म्हतलं, “उठून चालला जाय, कावून कि तुह्यावाल्या विश्वासानं तुले वाचवलं हाय.”
देवाचे राज्य प्रगट होणे
(मत्तय 24:23-28,37-41)
20जवा परुशी लोकायन त्याले विचारलं, कि देवाच राज्य कधी येईन? तवा येशूनं त्यायले उत्तर देलं, कि “देवाचं राज्य ह्या प्रकारे प्रगट होतं हाय कि तुमी त्याले आपल्या डोयायन नाई पाऊ शकणार. 21अन् लोकं हे नाई म्हणतीन, पाहा, अती हाय; पाहा ततीसाक हाय, कावून कि पाहा, देवाचं राज्य तुमच्या मधात हाय.” 22अन् त्यानं शिष्यायले म्हतलं, “असा वेळ येऊन रायला हाय, जवा तुमी त्या दिवसाले पाह्याची इच्छा ठेवसान, जवा मी, माणसाचा पोरगा वापस येईन, पण तुमी त्या दिवसाले पाऊ नाई शकणार.” 23लोकं तुमाले म्हणतीन, “पाहा, अती हाय,” किंवा पाहा ततीसाक हाय, पण तुमी इकडे-तिकडे जाऊ नका, अन् त्यायच्या मांग पऊ नका. 24कावून कि जशी वीज अभायाच्या एका इकडून चमकून अभायाच्या दुसऱ्या इकडे चमकते, तसचं माणसाच्या पोराच्या पण दिवसात होईन. 25पण पयले हे जरुरी हाय, कि त्याला लय दुख सोसाव, अन् या काळाच्या लोकायपासून तुच्छ मानला जावा. 26अन् जसं आपला पूर्वज नुहच्या दिवसात झालं होतं, तसचं माणसाच्या पोराच्या दिवसात पण होईन. 27पूर्वीच्या दिवसामध्ये जोपर्यंत नुहा जहाजावर चढला नव्हता, त्या दिवसापर्यंत लोकं खात-पीत होते, अन् त्याच्यात लग्न वगैरे होतं होते, अन् जवा जलप्रलय झाला तवा सर्वाचा नाश झाला. 28अन् तसचं जसं आपला पूर्वज लुतच्या दिवसात झालं, कि लोकं खात-पीत होते अन् देणे-घेणे करत होते, झाडे लावत होते, अन् घर बनवत होते. 29पण ज्या दिवशी लुत सदोम शहरातून निंगला, त्याचं दिवशी आग अन् गंधक स्वर्गातून पडले अन् सरे लोकं जे शहरात त्या सर्वाचा नाश करून टाकला. 30माणसाचा पोरगा ज्या दिवशी प्रगट होईन त्या दिवशी पण असचं होईन.
31त्या दिवशी जो जो घराच्या माळ्यावर अशीन, अन् त्याचं सामान घरात अशीन, त्यानं ते घेयासाठी खाली उतरू नये, अन् तसचं जो वावरात हाय, त्यायनं पण घेयासाठी वापस येऊ नये. 32आठवण ठेवा! लुतच्या बायको संग काय झालं होतं. 33अन् जो स्वताचा जीव वाचव्याले पाहीन तो त्याले गमाविन, अन् जो कोणी आपला जीव गमाविन तो त्याले वाचविन. 34मी तुमाले सांगतो त्या रात्री एका बाजीवर दोघं माणसं असतीन, तवा एकाले घेतलं जाईन अन् दुसऱ्याले सोडलं जाईन. 35दोन बाया चक्कीचा जातं फिरवत असतीन, एकीले घेतले जाईन अन् दुसरीले सोडले जाईन. 36दोघं जन वावरात असतीन, तवा एकाले घेतलं जाईन, अन् दुसऱ्याले सोडलं जाईन. 37हे आयकून त्यायनं त्याले विचारलं, “हे प्रभू हे कुठसाकं होईन,” तवा त्यानं त्यायले म्हतलं, “जती शव असेल, ततीच गिधाडे जमतीन,” हे चिन्ह दाखवते कि ते दिवस जवळ हाय.

Atualmente Selecionado:

लुका 17: VAHNT

Destaque

Compartilhar

Copiar

None

Quer salvar seus destaques em todos os seus dispositivos? Cadastre-se ou faça o login