मत्तय 15

15
परम्परा अन् आज्ञा मोडन्यावर प्रश्न
(मार्क 7:1-23)
1-2त्याच्या बाद एका दिवशी परुशी लोकं अन् कईक मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक यरुशलेम शहरातून येऊन येशू पासी जमा झाले होते. म्हणून परुशी लोकायन अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनं त्याले म्हतलं, “तुह्याले शिष्य पूर्वजाच्या परंपराले कावून नकारतात, कि हात न धुता जेवण करतात?”
3तवा येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी तुमच्या रीतीरिवाज मानायले, देवाच्या आज्ञा किती चांगल्या प्रकारे मोडता. 4-5कावून कि देवानं म्हतलं हाय, आपल्या बापाचा अन् मायचा मान ठेवजो, अन् जो कोणी माय बापाले वाईट म्हणीन, त्याले नक्की मारून टाकलं पायजे. पण तुमी म्हणता कि, जर कोणी आपल्या बापाले अन् मायले म्हणीन, कि जे काई तुले माह्याल्या पासून फायदा पोहचणार, ते देवाले दान केलं गेलं हाय.
6जो माणूस आपल्या माय बापाचा आदर करणार नाई तर तुमी आपल्या रीतीरिवाजाच्या नियमाच्या कारणाने देवाच्या नियमशास्त्राचे उलंघन करता. 7-8हे कपटी लोकायनो तुमच्या कपटा बद्दल यशया भविष्यवक्त्याने बरोबर म्हतलं हाय, कि हे लोकं होठायनं तर माह्याला सन्मान करतात, पण त्यायचं मन माह्यापासून दूर हाय.#15:7-8 कि हे लोकं होठायनं तर माह्याला सन्मान करतात, पण त्यायचं मन माह्यापासून दूर हाय. हे वचन यशया 29:13 मधून घेतलं हाय. 9अन् ते व्यर्थ माह्याली आराधना करतात, कावून कि ते माणसाच्या परम्परेले धर्म उपदेश म्हणून शिकवतात.”
खराब करणाऱ्या गोष्टी
10तवा येशूनं लोकायले आपल्यापासी बलावलं, अन् त्यायले म्हतलं, “तुमी सगळे आयका, अन् ध्यानात घ्या कि मी काय म्हणतो. 11जे तोंडात जाते, ते माणसाले खराब करत नाई, पण ज्या वस्तु माणसाच्या अंदरून बायर निगतात ते त्याले खराब करतात.” 12तवा शिष्यायनं येऊन येशूले म्हतलं कि, “काय तुले मालूम हाय, कि परुशी लोकं हे वचन आयकून अपमानित झाले.”
13येशूनं उत्तर देलं, “हरएक रोप जे माह्या स्वर्गाच्या बापाने नाई लावले, ते उपटून टाकल्या जाईन. 14त्यायले जाऊ द्या, ते फुटके रस्ते दाखवणारे हायत, अन् एक फुटका जर दुसऱ्या फुटक्याले रस्ता दाखविन, तर ते दोघही गड्यात पडतीन.”
15हे आयकून पतरसन येशूले म्हतलं, “ही कथा आमाले समजावून सांग.” 16-17येशूनं शिष्यायले म्हतलं, “काय तुमी एवढे नासमज हा? तुमाले मालूम नाई, कि जे काई तोंडात जाते कावून कि ते त्याच्या मनात नाई, पण त्याच्या पोटात जाते, अन् संडासातून बायर निगते;
18पण जे काई माणसाच्या शरीरातून बायर निगते तेच त्याले खराब करते. 19कावून की जे खराब विचार निगते, हत्या, व्यभिचार, परस्त्रीगमन, चोरी, खोटी साक्ष, अन् निंदा मनातूनच निगते. 20ह्या सगळ्या खराब गोष्टी अंदरून बायर निगतात अन् त्या माणसाले खराब करतात, पण हात न धुता जेवण करणे माणसाले खराब करत नाई.”
कनानी जातीच्या बाईचा विश्वास
(मार्क 7:24-30)
21येशू ततून निघाल्यावर सूर अन् सैदा नगराच्या इकळे चालला गेला. 22अन् पाहा, त्याचं प्रदेशातून एक कनानी जातीची बाई निघाली, अन् मोठं-मोठ्याने ओरडून म्हणू लागली, “हे प्रभू दाविद राजाच्या पोरा माह्यावर दया कर, माह्याल्या पोरीला भुत आत्मा लय तरास देऊन रायला हाय.”
23यावर येशूनं तिले काईच उत्तर देलं नाई, “तवा त्याच्या शिष्यांनी येऊन विनंती करून म्हतलं, इले जाऊ दे, कावून कि ते आपल्या मांग ओरडत येत हाय.” 24येशूनं उत्तर देलं कि, इस्राएलाच्या घराण्याच्या हारवलेल्या लोकायले सोडून मी कोणापासी पाठवल्या गेलो नाई.
25पण ते आली, अन् येशूला नमस्कार करून म्हणू लागली, “हे प्रभू माह्याली मदत कर.” 26त्यानं उत्तर देलं, “लेकरायले पयले जेवू दे, कावून कि लेकरायची भाकर कुत्र्यायले टाकणं चांगलं नाई.” 27मंग तिनं येशूले म्हतलं खरं हाय प्रभू, तरी पण कुत्र्ये टेबलाखाली लेकरायच्या हातचा पडलेला चुरा खातात. 28याच्यावर येशूने तिले उत्तर देलं कि, हे बाई तुह्या विश्वास मोठा हाय, जसं तू म्हणत, तुह्यासाठी तसचं व्हावं, अन् तिची पोरगी तवाच बरी झाली.
लय बिमाऱ्यायले बरं करणे
29येशू ततून गालील समुद्राच्यापासी आला, अन् पहाडावर चढला अन् बसला. 30तवा लोकायची गर्दीच्या-गर्दी, येशू पासी लंगडे, फुटके, मुके, दुंडे, अन् बरेचं साऱ्या लोकायले घेऊन त्याच्यापासी आले, अन् त्यायले येशूच्या पायापासी आणले, अन् येशूनं त्यायले बरे केले.
31जवा लोकांनी पायलं, कि मुके बोलतात, फुटके चांगले होतात, लंगडे चालतात, अन् फुटक्यांना दिसते, तवा हापचक होऊन इस्राएल देशाच्या देवाचा गौरव करू लागले.
चार हजार लोकायले जेवण
(मार्क 8:1-10)
32तवा येशूनं आपल्यापासी शिष्यायले बलावून म्हतलं, “कि मले या लोकायच्या मोठ्या गर्दीवर दया येत हाय, कावून कि त्यायच्यापासी खायाले काईच नाई, अन् ते तीन दिवसापासून माह्या संग हायत, मी त्यायले उपासी जाऊ देलं, तर असं नाई व्हावं, कि ते रस्त्याने थकून चक्कर येऊन पडून जातीन.” 33त्याच्या शिष्यायनं त्याले म्हतलं, “अती सुनसान जागी येवढ्या भाकरी कुठून आणायच्या की हे लोकं खाऊन तृप्त हो.”
34येशूनं शिष्यायले विचारलं, “तुमच्यापासी कितीक भाकरी हायत” त्यायनं म्हतलं, “सात भाकरी अन् थोडसाक मासोया हायत.” 35-36तवा येशूने लोकायले खाली जमिनीवर बशाले सांगतल, अन् त्या सात भाकरी अन् मासोया घेऊन देवाले धन्यवाद केला, त्या मोडल्या अन् त्यानं आपल्या शिष्यायपासी देवून वाढ्याले सांगतल्या अन् त्यायनं त्या लोकायले वाढल्या.
37अशाप्रकारे ते लोकं जेवून करून समाधानी झाले व उरलेल्या भाकरीच्या सात टोपल्या भरून घेतल्या; 38अन् जेवणाऱ्या पैकी बायाईले सोडून अन् लेकरायले सोडून चार हजार माणसं होते. 39मंग तो लवकरच आपल्या शिष्याय संग डोंग्यात बसून, मगदन भागात आला#15:39 मगदन भागात आला मार्क 8 :10 मध्ये दल्मनुथा शब्दाचा प्रयोग केल्या गेला हाय. .

Podkreślenie

Udostępnij

Kopiuj

None

Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj